Blue Print बद्दलचा प्रश्न, भाजप उमेदवार मैथिली ठाकूर म्हणते, 'हा खासगी विषय, मी सर्वांसमोर....'

Maithili Thakur On Blue Print: मैथिली ठाकूरला मतदारसंघाच्या ब्लू प्रिंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 4, 2025, 02:39 PM IST
Blue Print बद्दलचा प्रश्न, भाजप उमेदवार मैथिली ठाकूर म्हणते, 'हा खासगी विषय, मी सर्वांसमोर....'
मैथिली ठाकूर

Maithili Thakur On Blue Print: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांच्या घोषणा, आश्वासनं पाहायला मिळतायत. या सर्वात भाजप उमेदवार मैथिली ठाकूरची चर्चा सध्या जोरात आहे. संगीत क्षेत्रात प्राविण्य मिळवलेली मैथिली राजकारणात नवखी आहे. त्यामुळे अचानक ओढवलेल्या प्रसंगामुळे तिची अनेकदा फजिती झाल्याचे पाहायला मिळते. यावेळेस तिला मतदारसंघाच्या ब्लू प्रिंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पण ती गोंधळली. काय घडलं नेमकं? विस्तर जाणून घेऊया.  

Add Zee News as a Preferred Source

मैथिली ठाकूरने आपल्या गोड स्वरांनी लोकसंगीत आणि भक्तिगीतांद्वारे करोडोंची हृदय जिंकले. ती आता राजकीय पटावर पदार्पण करत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका विधानाने ती ट्रोल होऊ लागलीय. प्रचारादरम्यान एका पत्रकाराने मैथिलीला तिच्या मतदारसंघाच्या विकास आराखड्याबद्दल विचारले. यावर तिने थेट कॅमेरासमोर, "मी हे सर्वांसमोर कसे सांगू शकते? हा तर पूर्णपणे खासगी आणि गोपनीय बाब आहे," असे उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी त्यावरून तिची खिल्ली उडवलीय. 

मीम्स व्हायरल

मैथिलीची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलीय. कोणी तिला "राजकीय नवशिकी" म्हटलंय, तर कोणी "गुप्त आराखड्याची गुप्तहेर" म्हणून चिडवलंय. या विधानाने तिच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी भाजपच्या या स्टार उमेदवाराच्या राजकीय दृष्टिकोनावर टीका केली. एकाने लिहिले, "जेव्हा उमेदवार आपल्या भागाचा आराखडा गोपनीय असल्याचे सांगतो, म्हणजे त्याच्याकडे काहीच योजना नसते." 

दुसऱ्याने यूजरने म्हटले, "मतदारांना असे नेते नकोत जे उत्तर टाळतात, तर ज्यांच्याकडे खरी कल्पना आणि दृष्टिकोन असतो." काहींनी याला राजकारणातील नवीन ट्रेंड म्हटलंय, जिथे चेहर्‍याची ओळख असते, पण जमिनीवरची जाण नसते. मैथिलीचे नाव आता बिहारच्या युवा मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. समर्थक तिला "सांस्कृतिक वारसा जपणारी म्हणून पाहतात, तर  प्रसिद्धी आणि राजकारण हे दोन वेगळे क्षेत्र असल्याची टीका विरोधक करतायत.

संगीतातून राजकारणाकडे 

25 जुलै 2000 रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात जन्मलेली मैथिली ठाकूर बालपणापासून संगीतात रमली. तिचे वडील आणि आजोबा हे दोघेही संगीतकार असल्याने, त्यांनी तिला भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या सूक्ष्म अंगांचे प्रशिक्षण दिले. 2017 मध्ये 'रायझिंग स्टार' या टीव्ही शोमध्ये धावपळ करून ती देशभर ओळखली गेली. भावांबरोबर सोशल मीडियावर शेकडो लोकगीत आणि भजन गाऊन तिचे लाखो फॉलोअर्स बनलेयत. हळूहळू तिचे नाव फक्त गायिका म्हणून नव्हे, तर "मिथिला प्रांताची कन्या" म्हणून गाजले. भाजपने तिच्या या लोकप्रियतेला ओळखून तिला पक्षात सामावून घेतले. दारभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.

FAQ 

मैथिली ठाकूरला ट्रोलिंगचा सामना का करावा लागला?

बिहार विधानसभा निवडणुकीत पत्रकाराने तिच्या मतदारसंघाच्या विकास आराखड्याबद्दल विचारले असता, तिने "हा पूर्णपणे खासगी आणि गोपनीय बाब आहे" असे उत्तर दिले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर मीम्स आणि व्यंग्याची बाढ आली, ज्यामुळे तिच्या राजकीय तयारीवर प्रश्न उपस्थित झाले.

मैथिली ठाकूरची पार्श्वभूमी काय आहे आणि तिला उमेदवारी का मिळाली?

२५ जुलै २००० रोजी मधुबनीत जन्मलेली मैथिली संगीतकार कुटुंबातील आहे. २०१७ मध्ये 'रायझिंग स्टार' शोमध्ये रनर-अप झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर लोकगीत-भजन गाऊन लाखो अनुयायी मिळवले. तिच्या लोकप्रियतेमुळे भाजपने तिला अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.

मैथिलीच्या वादग्रस्त विधानाने काय बहस निर्माण केली?

"गोपनीय आराखडा" या उत्तराने प्रसिद्धी आणि राजकारण वेगळे असल्याची चर्चा उफाळली. समर्थक तिला सांस्कृतिक प्रतीक म्हणतात, तर विरोधक म्हणतात की मशहूर चेहऱ्यांना फक्त ओळखीच्या जोरावर टिकट देणे हा राजकारणातील नवीन ट्रेंड आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More