नवी दिल्ली : देशाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. आजच्याच दिवशीच भाजप सरकारने काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी नोटाबंदीची घोषणा केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी काहींनी या निर्णयाचे स्वागत केले होते तर काहींनी विरोध केला होता. यानिमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. जनतेच्या हाती मात्र फारसं काही आलेलं दिसत नाही.


पन्नास दिवसात देशात अस्तित्वात असणारं ८६ टक्के चलन बदलण्याचा हा निर्णय होता. लोक दिवस दिवसभर रांगेत उभे राहिले. बँकेच्या कर्मचा-यांनी रात्रीचा दिवस केला. ५०० आणि १०००च्या नोटा बदलता अनेकांच्या जीवनात उलथापालथ झाली. जनतेचे हाल झाले खरे, पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही नोटाबंदीचा निर्णय तितकास चांगला ठरला नाही, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र खोट्या नोटांच्या प्रसाराला मोठा आळा बसला. डिजिटल व्यवहारांमध्ये पहिल्या तीन महिन्यात मोठी वाढ झाली.