Bihar Election: 25 वर्षांची मैथिली ठाकूर बिहारमधून निवडणूक लढणार? विनोद तावडेंनी घेतली भेट, म्हणाली 'मला तर...'

BJP ticket to Maithili Thakur for Bihar Election: भाजपा मैथिली ठाकूरला दरभंगामधील मधुबनी आणि अलीगढ यापैकी एक जागा देण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2025, 11:38 AM IST
Bihar Election: 25 वर्षांची मैथिली ठाकूर बिहारमधून निवडणूक लढणार? विनोद तावडेंनी घेतली भेट, म्हणाली 'मला तर...'

BJP ticket to Maithili Thakur for Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून, आता सर्व पक्षांनी उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान एका नावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडिया फेम गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीत तिच्या मधुबनी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी नवी दिल्लीत मैथिली आणि तिच्या वडिलांची भेट घेतली  होती. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रायदेखील सोबत होते. यानंतर मैथिली ठाकूर निवडणूक लढण्याच्या शक्यतांना बळ मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एक्सवर फोटो शेअर करताना विनोद तावडे यांनी मैथिलीला "बिहारची मुलगी" असं संबोधलं असून, राज्यात तिचं पुन्हा स्वागत केलं. राष्ट्रीय जनता दलावर (RJD) टीका करताना विनोद तावडे यांनी लिहिलं की, "1995 मध्ये लालू सत्तेत आल्यानंतर बिहार सोडून गेलेल्या कुटुंबांना, त्या कुटुंबाची कन्या, प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरजी, बिहारमध्ये होणारा विकास पाहून राज्यात परत येऊ इच्छितात".

नित्यानंद राय आणि तावडे यांनी मैथिलीला बिहारच्या लोकांसाठी योगदान देण्याचं आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. तावडेंच्या पोस्टवर व्यक्त होताना मैथिलीने कृतज्ञता व्यक्त केली. "बिहारसाठी मोठी स्वप्नं पाहणारे लोक, त्यांच्याशी होणारं प्रत्येक संभाषण मला दूरदृष्टी आणि सेवेच्या शक्तीची आठवण करून देते. मनापासून आदर आणि कृतज्ञता," असं तिने म्हटलं आहे. 

मैथिलीही निवडणूक लढण्यास इच्छुक

मैथिली ठाकूरने आपण निवडणूक लढू शकतो असे संकेत दिले आहेत. मैथिलीने म्हटलं आहे की, जर तिला भाजपाकडून तिकीट मिळत असेल, तर मला ही संधी सोडायची नाही. तसंच आपल्याला आपल्या क्षेत्रातील लोकांचं काम करायची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. दरभंगा आणि मधुबनी दोन्ही आपल्या घरासारखं आहे. जर पक्षाने संधी दिली तर मला अलीनगर किंवा बेनीपट्टी मतदारसंघातून निवडणूक लढायला आवडेल असंही तिने सांगितलं आहे. 

मैथिली ठाकूरने सांगितलं आहे की, आगामी काळात बिहारमधील तरुणांच्या विकासाबद्दल विचार करायचा आहे. जर मला माझ्या क्षेत्रातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, तर यापेक्षा मोठा आनंद नाही अशा भावनाही तिने व्यक्त केल्या आहेत. 

भाजपा मैथिली ठाकूरला दरभंगामधील मधुबनी आणि अलीगढ यापैकी एक जागा देण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान मोदींनी केलं होतं कौतुक

जानेवारी 2024 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैथिलीचं प्रभू श्रीरामाला वनवासात अर्धे खाल्लेले फळ अर्पण केलेल्या माँ शबरी यांच्यावरील गाणं गायल्याबद्दल मैथिली ठाकूरचं कौतुक केलं होतं.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान, पंतप्रधान मोदींनी मैथिलीचं एक गाणं शेअर केलं आणि लिहिलं, "अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेचा प्रसंग देशभरातील माझ्या कुटुंबातील सदस्यांना भगवान श्री राम यांच्या जीवनाशी आणि आदर्शांशी संबंधित प्रत्येक घटनेची आठवण करून देत आहे. अशीच एक भावनिक घटना शबरीशी संबंधित आहे. मैथिली ठाकूरजींनी ती कशी तिच्या सुरेल सुरांमध्ये रचली आहे ते ऐका."

 

FAQ

1) मैथिली ठाकुर यांच्या बिहार निवडणुकीतील सहभागाबद्दल मुख्य माहिती काय आहे?
लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकुर यांना बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये भाजपच्या तिकिटावर उभे राहण्याची शक्यता आहे. त्या मधुबनी किंवा दारभंगा जिल्ह्यातील अलीगढ किंवा अलीनगर येथून लढण्याची चर्चा आहे. ही अफवा भाजपच्या निवडणूक प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी त्यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर तीव्र झाली आहे. मैथिली ठाकुर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्वी प्रशंसा केली होती आणि त्या बिहारच्या 'मुलगी' म्हणून ओळखल्या जातात.

2) मैथिली ठाकुर यांच्या उमेदवारीच्या अफवांचे कारण काय आहे?
मैथिली ठाकुर यांनी नुकतीच बिहार भेट दिली आणि भाजप नेत्यांशी बिहारच्या भविष्याबद्दल चर्चा केली. विनोद तावडे यांनी त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत 'बिहारची मुलगी' म्हणून स्वागत केले. ही बैठक बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने उमेदवारीच्या तर्कवितर्कांना उधाण आले. पूर्वी पवन सिंगप्रमाणेच मैथिली ठाकुर यांना भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे बिहारच्या सांस्कृतिक प्रभाव असलेल्या उमेदवाराची रणनीती दिसून येते.

3) मैथिली ठाकुर कोणत्या जागेवरून लढू शकतात?
भाजपने मैथिली ठाकुर यांना मधुबनी किंवा दारभंगा जिल्ह्यातील अलीगढ किंवा अलीनगर येथील जागा ऑफर करण्याची शक्यता आहे. त्या स्वतः आपल्या गावाच्या मतदारसंघातून (मधुबनी) लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, कारण त्यांना तेथे भावनिक नाते आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More