blinkit ambulance: आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की ब्लिंकिट ही सामान डिलिव्हरी करणारी कंंपनी आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ब्लिंकिट या कंपनीने एक उल्लेखनीय काम केले. त्यामुळे एका वयोवृद्धाला वेळीच मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचण्यात आला. आजवर कित्येकांचे प्राण उपचारामधील कमतरतेमुळे नाही तर रुग्नवाहिका वेळेवर न मिळल्याने दगावले. अश्यात ब्लिंकिटची ही कामगिरी खरंच कौतुकास्पद ठरतेय.
एका महिलेने अलीकडेच ब्लिंकिटच्या रुग्णवाहिकेने तिच्या आजोबांचे प्राण कसे वाचवले याबद्दल एक हृदयस्पर्शी कहाणी शेअर केली. ब्लिंकिट या फास्ट बिझनेस कंपनीने 2025च्या सुरुवातीला त्यांची 10 मिनिट्स रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या रुग्नवाहिकेचा उद्देश जलद आणि विश्वासार्ह वैद्यकीय मदत देणे होता. अलीकडेच एका महिलेच्या लिंक्डइन पोस्टनुसार, तिच्या आजोबांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती आणि ब्लिंकिटची रुग्णवाहिका तातडीने पोहोचली तसेच रुग्णाला रुग्णालयात नेताना नीट काळजी घेतली गेली.
महिला म्हणाली "माझ्या आजोबांना तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती आणि आम्ही ब्लिंकिट रुग्णवाहिका बोलावली. मला नेहमीची लांब वाट, गोंधळलेली गर्दी आणि अस्पष्ट प्रक्रिया अपेक्षित होत्या. पण पुढे जे घडले ते पाहून मी थक्क झाले. काही मिनिटांतच रुग्णवाहिका पोहोचली. मी पाहिलेल्या कोणत्याही सेवेपेक्षा लवकर, पॅरामेडिक्स आणि कर्मचारी सगळेच प्रोफेशनल होते त्यांनी जागेवरच चाचण्या (बीपी, साखर, ऑक्सिजन पातळी) केल्या आणि आम्ही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तब्येत स्थिरावण्याचा प्रयत्न केला. सुश्री कटारियाने रुग्णवाहिका पथकाची प्रशंसा केली आणि डॉक्टर येईपर्यंत कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेऊन त्यांनी त्यांच्या कर्तव्यांपेक्षाही मोठी कामगिरी कशी केली हे सांगितले. शिवाय, ही सेवा पुर्णपणे मोफत होती.
संस्थेच्या संस्थापक दीपिंदर गोयल यांनी महिलेच्या पोस्टला प्रतिसाद दिला आणि ब्लिंकिटची रुग्णवाहिका सेवा मदत करण्यास सक्षम असल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनी आजोबांच्या लवकर बरे होण्याच्या आशेने शुभेच्छाही दिल्या. "आम्हाला मदत करता आली याचा मला खूप आनंद आहे. तुमच्या आजोबांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा," असे सांगितले.
काही वृत्तानुसार सांगितले जाते की एका वर्षातच या सेवेने तब्बल 2300 लोकांचा जीव वाचवला आहे. तुम्हाला काय वाटतं, ही सेवा महाराष्ट्रातही सुरु व्हायला हवी का?
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.