मुंबई : इंटरनेटवर आपल्याला लहान मुलांचे गोंडस व्हिडीओ पाहायला मिळतात. हे खरोखरंच खुप मनोरंजक असतात. लहान मुलांचा निरागसपणा लोकांना फारच भावूक करतो. ज्यामुळे लोक याला आवडीने पाहातात आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सर्वांनाच अश्चर्यचकीत करत आहे. हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. जो अनेक महिलांमध्ये आपल्या आईला शोधत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक महिल्या साडीचा पदर तोंडावर घेऊन एका ओळीत बसल्या आहेत. तेवढ्यात एक लहान मुलं येतं आणि आपल्या आईला शोधू लागतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सगळ्यात महिला या बाळाला आपल्याकडे प्रेमाने बोलवत असतात. परंतु हा मुलगा कोणाकडे ही जात नाही. हा चिमुकला प्रत्येक महिलेसमोर जाऊन उभा राहातो आणि यातील आपली आई कोणती यावर विचार करतो.


व्हिडीओ पाहाताना आपल्याला वाटेल की एवढं बाळ ते, त्याला कुठे ओळखता येणार आपली आई? बरं सगळ्याच महिला सारख्या रंगाच्या साडीत आहेत. मग त्याला कसं कळणार आपली आई.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


परंतु हा लहानगा सगळ्यांना खोटं ठरवतो आणि शेवटे एवढ्या सगळ्या महिलांमध्ये आपल्या आईला शोधूव काढतोच. जे पाहून सोशल मीडियावर देखील लोकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.


हा क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर status.fan.tranding नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 6 लाख 3 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी, हा क्यूट व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक सतत त्यावर कमेंट देखील करत आहेत.