Brahmos Deal: भारताने जगातील सर्वात मोठी डील केली आहे. 38,78,79,54,030 एवढ्या किंमतीची ही डील आहे. या बदल्यात भारत एका सर्वात मोठ्या मुस्लिम देशाला आपले 'ब्रह्मास्त्र' देणार आहे. भारताच्या मदतीने हा मुस्लिम देश आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. जाणून घेऊया हा देश कोणता ज्याने भारतातासोबत हा मोठा करार केला आहे.
भारताने निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांची जगभरात चर्चा आहे. 'ब्रह्मास्त्र' हे भारताकडे असलेले सर्वात शक्तीशाली आणि घातक क्षेपणास्त्र आहे. इंडोनेशियाने भारताककडून 'ब्रह्मास्त्र' हे विकत घेतले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत दैऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते भारताचे सर्वात धोकादायक शस्त्र 'ब्रह्मोस' खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब करू शकतात. गेल्या महिन्यात भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान या दीर्घकालीन करारावर चर्चा झाली होती. वेग आणि अचूकतेसाठी ओळखले जाणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र इंडोनेशियाच्या किनारपट्टी आणि सागरी संरक्षणा क्षमता वाढवेल अशी पोस्ट इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री सजाफरी सजामसोदीन यांनी केली आहे. यामुळे इंडोनेशिया आणि भारतातील ही डील निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सुमारे 38 अब्ज रुपयांच्या ब्रह्मोस डीलबाबत भारताला पत्र पाठवल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. SBI किंवा इतर कोणत्याही भारतीय राष्ट्रीय बँकेकडून या करारासाठी भारत इंडोनेशियाला कर्ज देण्याची शक्यता आहे. EXIM बँक सुरुवातीला इंडोनेशियाला कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू करणार होती. मात्र, हे प्रत्यक्षात हे शक्य झाले नाही.
सुबियांतोच्या भारत दौऱ्यादरम्यान या मोठ्या कराराची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो आमंत्रित करण्यात आले आहे. हा करार झाल्यास भारातकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा देश असेल. यापूर्वी फिलिपाइन्स या देशाने भारताकडून ब्रम्हास्त्र खरेदी केले आहे. भारताने जानेवारी 2022 मध्ये फिलीपिन्ससोबत 375 दशलक्ष डॉलर किंमतीचा महत्त्वाचा करार केला होता. हा भारताचा पहिला मोठा संरक्षण निर्यात करार होता. यासह भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी 700 दशलक्ष डॉलर्सचा करार अंतिम टप्प्यात आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND
(20 ov) 209/9
|
VS |
NAM
116(18.2 ov)
|
| India beat Namibia by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(19.3 ov) 123
|
VS |
ITA
124/0(12.4 ov)
|
| Italy beat Nepal by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 225/5
|
VS |
OMA
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.