भटक्या कुत्र्यांना ताबडतोब...; 8 आठवड्यांची मुदत देत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court on Stray Dogs : भटक्या श्वानांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं अतिशय मोठा निर्णय सुनावत प्रशासनाला महत्त्वाच्या सूचनावजा निर्देश दिले आहेत.   

सायली पाटील | Updated: Nov 7, 2025, 12:39 PM IST
भटक्या कुत्र्यांना ताबडतोब...; 8 आठवड्यांची मुदत देत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Breaking news Remove Stray Dogs From Bus Stands Railway Stations says supreme court

Supreme Court on Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं अतिशय कठोर भूमिका घेत त्यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. न्यायालयाच्या वतीनं 8 आठवड्यांची मुदत देत रेल्वे स्थानकं, रुग्णालयांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवलकून ताबडतोब भटक्या कुत्र्यांना हटवण्यात यावं अशा सक्त सूचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिलेल्या 8 आठवड्यांच्या मुदतीमध्ये शैक्षणिक संस्थांपासून रुग्णालयं, बस थांबे, रेल्वे स्थानकं या आणि तत्सम परिसरांतून भटके कुत्रे हटवून त्यांना 'डॉग शेल्टर होम'मध्ये स्थलांतरित करण्याचेही आदेश दिले. 

Add Zee News as a Preferred Source

भटक्या कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडावं, जिथून त्यांना आणण्याल आलं आहे या भूमिकेवर न्यायालय ठाम असल्याचं पाहायला मिळालं. सदर परिसर आणि तत्सम परिघातून भटक्या कुत्र्यांना दूर केल्यानंतर ते पुन्हा तिथे वावरताना दिसणार नाहीत याचीही काळजी घेण्याच्या सूचना न्यायालयानं देत 8 आठवड्यांच्या आत याबाबत कार्यवाही करावी असं सांगत त्यासंदर्भातीर कामकाज व्यवस्थित सुरू आहे की नाही हे सुनिश्चित करणअयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना न्यायालयानं केली आहे. 

न्यायालयाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे... 

  • शैक्षणिक संस्थानं, रुग्णालयं, बस थांबे, खेळाची मैदानं, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणहून बटक्या कुत्र्यांना हटवणं. 
  • भटक्या कुत्र्यांना 'डॉग शेल्टर होम'मध्ये पाठवणं 
  • तातडीनं 8 आठवड्यांच्या आत याची अंमलबजावणी अपेक्षित 
  • कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

अमायकस प्रस्तुत रिपोर्टला विचारात घेत या आदेश प्रक्रियेत त्याचाही समावेश करण्याची सूचना करत प्रत्येक राज्य, केंद्र शासित प्रदेशातील न्यायलयांच्या निर्देशांसह या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Explained : खरेदी खत तयार करण्याची प्रक्रिया काय? या टप्प्यानंतर पुढची प्रक्रिया समजून घ्या 

राजस्थान न्यायालयाच्या निर्देशांचाही उल्लेख 

सर्वोच्च न्यायालयाच्या माहितीनुसार राजस्थान उच्च न्यायालयानं जारी केलेल्या त्या निकालवजा आदेशांनाही विचाराधीन घ्यावं, ज्यामध्ये PWD नगरपालिका प्राधिकरण, रस्ते आणि परिवहन विभागानं महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवरून तत्सम प्राण्यांना हटवून त्यांना तातडीनं त्यांच्या मूळ स्थांनांवर पुनर्वसित करण्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार भटके कुत्रे आणि प्राण्यांबाबत माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकसुद्धा जारी करण्यात येणार असून, सर्व राज्यांचे मुख्य सचिव या सूचनांचं सक्तीनं पालन करणार असल्याची बाब न्यायालयानं अधोरेखित केली. 

FAQ

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काय करावे?
सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांबाबत अतिशय कठोर भूमिका घेत शैक्षणिक संस्थानं, रुग्णालयं, बस थांबे, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांना 'डॉग शेल्टर होम'मध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांतील महत्त्वाचे मुद्दे?
शैक्षणिक संस्थानं, रुग्णालयं, बस थांबे, खेळाची मैदानं, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणहून भटक्या कुत्र्यांना हटवणं, भटक्या कुत्र्यांना 'डॉग शेल्टर होम'मध्ये पाठवणं,तातडीनं 8 आठवड्यांच्या आत याची अंमलबजावणी अपेक्षित.

काय आहे राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशांबाबत?
राजस्थान उच्च न्यायालयानं जारी केलेल्या त्या निकालवजा आदेशांनाही विचाराधीन घ्यावं, ज्यामध्ये PWD नगरपालिका प्राधिकरण, रस्ते आणि परिवहन विभागानं महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवरून तत्सम प्राण्यांना हटवून त्यांना तातडीनं त्यांच्या मूळ स्थांनांवर पुनर्वसित करण्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More