मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड  Bharat Sanchar Nigal Limited (BSNL) ही सरकारी दूरसंचार कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. मोबाईल रिचार्ज प्लान आणि इंटरनेट डेटाची  स्पर्धा दिवसागणिक वाढत आहे. खासगी कंपनीकडे ग्राहक आपल्याकडे वळविण्यासाठी खास योजना आणत आहे. बीएसएनएलने आणखी एक जबरदस्त रिचार्ज प्लान आणला आहे. बीएसएनएलने नुकतीच 249 रुपयांची योजना सुरु केली आहे. या योजनेत मिळालेल्या फायद्यांमधून एअरटेल, जिओ आणि vi सारख्या दूरसंचार कंपन्यांसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.


 249 रुपयांच्या योजनेत काय विशेष?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या सहयोगी वेबसाइट  zeebiz.com नुसार बीएसएनएलने अलिकडेच 249 रुपयांचा रिचार्ज प्लान बाजारात आणला आहे. या योजनेत प्रीपेड ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त, कोणत्याही नेटवर्कमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळत आहे. ऑफर येथे समाप्त होत नाहीत. या रिचार्ज योजनेत वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. बीएसएनएलच्या या रिचार्ज योजनेची वैधता 60 दिवस आहे. ही प्रीपेड रिचार्ज योजना आहे. आम्ही आपल्याला सांगतो की, हे फर्स्ट रिचार्ज कूपन (First Recharge Coupon (FRC) गेल्या महिन्यातच एक प्रमोशनल ऑफर म्हणून लॉन्च केले गेले. ही योजना केवळ त्यांच्या ग्राहकांसाठी आहे जे प्रथमच त्यांचे नंबर रिचार्ज करतील, त्यांच्यासाठी आहे.


दोन महिन्यांपर्यंत रिचार्ज  


बीएसएनएलच्या या 249 रुपयांच्या रिचार्ज योजनेची वैधता 60 दिवसांची आहे. म्हणजेच एकदा ग्राहकांचे रिचार्ज झाल्यावर पुन्हा दोन महिन्यांसाठी रिचार्ज करण्याची गरज नाही.


लवकरच संपूर्ण देशात 4 जी सेवा  


आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने बीएसएनएलला देशभरात 4 जी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आता बीएसएनएल देशभरात 4 जी सेवा प्रदान करेल. प्राप्त माहितीनुसार सरकारी दूरसंचार कंपनीने यासाठी तयारी सुरु केली आहे.