नवी दिल्ली : रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी भारत सरकार पुढील १२ वर्षात जवळजवळ ५० लाख कोटी रूपये खर्च करणार आहे. या पैशांचा उपयोग रेल्वेसाठी नवीन ट्रॅक बनवणे, जुने ट्रॅक आणखी व्यवस्थित बनवणे, रेल्वेगाड्यांचा वेग वाढवणे, तसेच रेल्वे प्रवाशांसाठी आणखी सर्वोत्तम सुविधा देणे.
रेल्वेचा एका चौकटीत विकास करण्यासाठी पैशाची गरज पडणार आहे. यासाठी खासगी क्षेत्राची भागेदारीने काम करण्यात येईल. म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (PPP) ने हे काम करण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रालाही रेल्वेत गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले जाणार आहे.
रेल्वे स्टेशन्सना पुढील काळात अधिक आधुनिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं जात आहे. यासोबत प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देखील देण्यात येणार आहे, यासाठी देखील काम सुरू आहे.
सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी देखील मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणार आहे. यासाठी जुने रेल्वे रूळ बदलून, योग्य असा ताळमेळ साधून, रेल्वे रूळ बदलण्यावर मोठा खर्च करावा लागणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.