Budget 2024 : देशाचा बहुप्रतिक्षित असा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून, जिथं यंदाच्या अर्थसंकल्पानंतर नेमकं काय स्वस्त आणि काय महाग होणार? याच प्रश्नाच्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तिथंच अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. किंबहुना तशी सुरुवात झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कारण, गॅस दर पुन्हा वाढले आहेत. अर्थात हे घरगुती वापरातील गॅस सिलेंडर नसून, व्यावसायिक गॅसच्या दरात ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस 14 रुपयांनी महागला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. परिणामी आता हॉटेलमधील खाणं महागण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. 


मागच्याच महिन्यामध्ये व्यावसायिक गॅसचे दर 1.50 रुपयांनी वाठढले होते. ज्यानंतर आता ही नवी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु असल्यामुळं गॅस सिलेंडरच्या मागणीमघ्ये वाढ असून, त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील एकंदर दरांवर झाले आहेत. 


हेसुुद्धा वाचा : Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पाकडेही गांभीर्यानं पाहा, कारण 2019 मध्ये करण्यात आलेल्या 'या' मोठ्या घोषणा 


कोणत्या शहरात किती फरकानं झाली व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ? 


देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नेमकी कोणत्या फरकानं व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तरही पाहून घ्या. 


  • दिल्ली- प्रति सिलेंडर दर 14 रुपयांनी वाढून ते 1769.50 रुपयांवर पोहोचले आहेत. 

  • चेन्नई- प्रति सिलेंडर 12.50 रुपयांनी वाढला असून, एकूण दर 1937 रुपयांवर पोहोचला आहे. 

  • कोलकाता- प्रति सिलेंडरचे दर 18 रुपयांनी वाढले असून, नवी किंमत आहे 1887 रुपये. 

  • मुंबई- इथं प्रति सिलेंडर किमती 15 रुपयांनी वाढल्या असून, एकूण किंमत पोहोचली आहे 1723.50 रुपयांवर