Budget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..
Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...
Aadhar card Pan Card link status : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) सध्या लोकसभेत बजेट सादर (Budget 2023) करत आहेत. सर्व देशात भारताचा विकास दर अधिक आणि देश वेगाने प्रगती करत आहे, असं म्हणत सीतारमण यांनी भाषणाला सुरूवात केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) आज 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी पॅन कार्डला आता अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
इन्कम टॅक्सकडून एक महत्वाची आणि मोठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. यानुसार, तुम्हाला लवकरात लवकर तुमचं पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करावं लागणार आहे. कारण 31 मार्चपर्यंत जर तुम्ही लिंक केलं नाहीत तर ते बिनकामाचे समजण्यात येईल.जर तुम्हीसुद्धा अद्याप तुमचं पॅन आधारशी लिंक केलं नसेल तर घाई करा, ताबडतोब हे काम उरकून घ्या. (Aadhar card Pan Card link status online news in marathi)
असं न केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आयटी रिटर्न (IT Return ) तुम्ही फाईल करू शकणार नाहीत, इतकंच काय तर, आवश्यक अश्या सुविधांचा लाभसुद्धा घेऊ शकणार नाहीत. तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड आधारसोबत लिंक करू शकतात, पॅन ते करण्यासाठी काही गाईडलाईन्स पाळाव्या लागतील , काय आहेत त्या गाईडलाईन्स चला जाणून घेऊया.
पॅनला आधारशी लिंक कसे कराल
पॅन आधारसोबत लिंक करण्यासाठी तुम्हाला बँक कस्टमर केअरला कॅल करायचा आहे.
कॉल केल्यानंतर IVR मेन्यूचा ऑप्शन दिसेल यात जाऊन राईट मेन्यू ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल.
हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा कस्टमर केअर एग्झिक्यूटिव्हला कनेक्ट करा.
एग्झिक्युटिव्ह तुम्हाला क्वेरी विचारेल तेव्हा, त्यांना सांगा कि तुम्हाला पॅन कार्ड आधारसोबत लिंक करायचे आहे.
वेरिफिकेशनसाठी काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, तुम्हाला याची उत्तर द्यायची आहेत.
पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तो सांगायचा आहे.
ऑनलाईन कसा कराल पॅन आधारसोबत लिंक
यासाठी तुम्हाला incometax.gov.in/iec/foportal या साईटला विझिट करावं लागेल
पेज ओपन झाल्यावर 'Quick Links' या सेक्शनवर क्लीक करा, स्क्रोल केल्यावर लिंक आधार हा ऑप्शन दिसेल.
यात नाव नोंदवावा लागेल. या नंतर मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर तिथे टाकायचे आहेत.
आता व्हेरिफिकेशन ऑप्शन सिलेक्ट करा.
आता continue ऑप्शनवर क्लिक करा.
तुमचा आधार कार्डसाठी असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे यावर एक OTP येईल.
आता तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केल जाईल. (how to link pan card with aadhar card know the status online news in marathi)