मुंबई :  देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी HDFC बँकेने आपले शेअर होल्डर्सला कोरोना काळात आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने शुक्रवारी आपल्या शेअर्स होल्डर्सला मोठा लाभांश देण्याची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HDFC Bank च्या बोर्डने 31 मार्च 2021 ला समाप्त झालेल्या वित्तीय वर्षासाठी प्रति शेअर 6.50 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. HDFC Bank ने आपल्या घोषणेत म्हटले आहे की, लाभांश देण्याचा अंतिम निर्णय वार्षिक आम सभेत घेतला जाणार आहे. 


HDFC Bank ची वार्षिक सर्वसाधारण सभा 17 जुलै रोजी होणार आहे. कोविडच्या परिस्थितीत बँक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या बैठकीचे नियोजन करेन.


बँकेच्या बोर्डाने म्हटले आहे की, एजीएममध्ये डिव्हिडंड देण्याच्या निर्णाला मंजूरी मिळाल्यास शेअर होल्डर्सला याचे डिजिटल पेमेंट केले जाणार. तसेच त्यांना 2 ऑगस्ट 2021 पर्यंत डिव्हिडंड वारंट डिस्पॅच करण्यात येईल.


HDFC Bank ने शुक्रवारी उमेश चंद्र सारंगी यांची पुन्हा स्वतंत्र निर्देशक म्हणून नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब  केला आहे. त्यांचा कार्यकाळ 1 मार्च 2021 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे.