)
Share Market Investment : सणासुदीच्या या दिवसांमध्ये एकिकडे सोन्याच्या दरांना झळाळी मिळत असतानाच दुसरीकडे शेअर बाजारात सुरू असणाऱ्या आर्थिक उलाढालीलासुद्धा चांगलाच वेग मिळताना दिसत आहे. दिवाळीच्या दोन आठवड्यांपूर्वीचाच आढावा घ्यायचा झाल्यास 6 ते 10 ऑक्टोबरचा काळ हा दमदार कामगिरीचा ठरला. जिथं 30 शेअर असणाऱ्या सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 पैकी 8 वॅल्यूएबल मार्केट कॅपला उसळी मिळाली. या यादीत रिलायन्सपासून सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेल आणि टाटा कंसल्टन्सीचा आणि इंफोसिसचाही सहभाग पाहायला मिळाला.
एकत्रितरित्या आढावा घेतल्यास या कंपन्यांच्या मार्केट वॅल्यूमध्ये 1.94 लाख कोटी रुपयांची तेजी आली. तर, सर्वाधिक फायदा TCS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा झाला. ज्यांना कथित स्वरुपात 5 दिवसांत तब्बल 45000 कोटी रुपयांची धडाकेबाज कमाई करता आली. दिवाळीच्या आधी झालेल्या या फायद्यामुळं जणू गुंतवणूकदारांसाठी कुबेराची तिजोरीच उघडली.
सध्या टाटा समुहामध्ये अंतंर्गत वादंग माजल्यानं बऱ्याच घडामोडी घडत असल्या तरीही TATA च्याच अंतर्गत येणाऱ्या टाटा कंसल्टन्सी सर्विस अर्थात TCS कडून मात्र उत्तम त्रैमासिक कामगिरी केल्यानं त्याचा थेट परिणाम शेअरवर दिसून आला. TCS Stock मध्ये उसळी आल्या कारणानं त्यात गुंतवणूक करणाऱ्यांचा मोठा फायदा झाला. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार संपूर्ण आठवड्याच्या कार्यालयीन दिवसांदरम्यान गुंतवणूकदारांना थेट 45678 कोटी रुपये इतका नफा झाला. ज्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅपचा आकडा 10,95,701.65 कोटी रुपयांवर पोहोचला. यामागे बाजी मारली ती म्हणजे इन्फोसिसनं. ज्यांचा मार्केट कॅप 6,29,080.22 कोटी रुपयांवर पोहोचला.
शेअर बाजारातील मागील आठवड्याचा आढावा घेतल्यास अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळं शेअर बाजारातील उलाढालीला मोठा आधार मिळाला. संपूर्ण आठवड्यात एकूण 1293.65 अंकांची अर्थात 1.59 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ज्या 8 कंपन्यांच्या मार्केट वॅल्यूला फायदा झाला यामध्ये RIL, HDFC Bank, Bharti Airtel, TCS, ICICI Bank, SBI, Bajaj Finance सह Infosysचा समावेश आहे.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी24 तास त्याची खातरजमा करत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक ही जोखमीची बाब असल्यान तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन अवश्य घ्या.)
ऑक्टोबर 6 ते 10 या काळात सेन्सेक्समध्ये कोणत्या कंपन्यांना फायदा झाला?
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी आघाडीच्या 10 पैकी 8 कंपन्यांना मार्केट कॅपमध्ये वाढ झाली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), भारती एअरटेल (सुनील मित्तल यांच्या), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिसचा समावेश आहे.
या कंपन्यांच्या एकत्रित मार्केट व्हॅल्यूमध्ये किती वाढ झाली?
या कंपन्यांच्या एकत्रित मार्केट व्हॅल्यूमध्ये 1.94 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली.
सेन्सेक्समध्ये तेजीमुळे कोणत्या कंपन्यांना फायदा झाला?
RIL, HDFC बँक, भारती एअरटेल, TCS, ICICI बँक, SBI, बजाज फायनान्स आणि इन्फोसिस या 8 कंपन्यांना मार्केट व्हॅल्यूमध्ये फायदा झाला.