सेमी कंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे सेंकंड हॅंड कारची मागणी वाढली; या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीची शक्यता

जगभरातील बाजारांमध्ये सेमी कंडक्टर चीपचा तुटवडा भासत आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर चीपच्या कमतरतेमुळे ऑटो सेक्टर अडचणीत आहे.

Updated: Sep 6, 2021, 01:26 PM IST
सेमी कंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे सेंकंड हॅंड कारची मागणी वाढली; या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीची शक्यता title=

नवी दिल्ली : जगभरातील बाजारांमध्ये सेमी कंडक्टर चीपचा तुटवडा भासत आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर चीपच्या कमतरतेमुळे ऑटो सेक्टर अडचणीत आहे. अनेक प्रमुख कंपन्यांनी यामुळे प्रोडक्शन कमी केले आहे. नवीन गाड्यांचा वेटिंग अवधी वाढला आहे. अशातच सेकंड हॅंड वाहनांच्या मार्केटमध्ये तेजी आली आहे. बाजारात नुकतीच लिस्टेट झालेली CarTrade Tech कंपनीच्या शेअरला याचा फायदा होऊ शकतो. मार्केट ऍनालिस्ट आशिष चतुर्वेदी यांनी याबाबत आपला रिपोर्ट दिला आहे.

कार ट्रेडच्या शेअर्समध्ये तेजीची शक्यता
आशिष चतुर्वेदीचे म्हणणे आहे की, सेकंड हॅंड कार मार्केटच्या बिझनेसशी संबधीत ही कंपनी नुकतीच मार्केटमध्ये लिस्टेड झाली आहे. सेंकड हॅंड कारचे मार्केट जेवढे तेजीत असेल तेवढा या शेअरला फायदा होऊ शकतो. कारट्रेड जवळ एक मल्टी चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या व्हिकल आणि वॅल्यु एडेड सर्विसेस सामिल आहेत.

कारट्रेडचा स्टॉक 20 ऑगस्ट रोजी बाजारात लिस्ट झाला होता. त्याची इश्यु प्राइज 1618 रुपये होती आणि सध्या शेअर 1480 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.

सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑटो सेक्टर मधील प्रोडक्शन घटले आहे. सेमी कंडक्टरचा वापर नवीन वाहनांमध्ये केला जातो.  नवीन कार खरेदी आणि त्याचा वेटिंग पिरिअड 4 ते 6 महिने झाला आहे. त्यामुळे सेंकंड हॅंड वाहनांचे मार्केट तेजीत येण्याची शक्यता आहे.