CBSE Board 12th Result 2025 Latest Updates in Marathi: सीबीएसई बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. 13 मे रोजी सीबीएसईने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. तुम्ही सीबीएसई दहावी आणि बारावीचे निकाल cbseresults.nic.in येथे जाऊन डाउनलोड करू शकता.
यावर्षी बारावीच्या परीक्षेत 16,92,794 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 14,96,307 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 18 मार्च रोजी झाल्या, तर बारावीची शेवटची परीक्षा 4 एप्रिल रोजी झाली.
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात मुलं की मुलींनी बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. तर यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या उत्तीर्णतेचा टक्का पाहता मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का हा 91.64% आहे, तर मुलांचा 85.70% आहे आणि ट्रान्सजेंडरचा उत्तीर्णतेचा टक्का 100% आहे. यंदाच्या वर्षीचा (२०२५) निकाल 2024 पेक्षा चांगला लागला आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलांपेक्षा 5.94% जास्त आहे.