मुंबई : CBSEची परीक्षा पद्धती बदलणार आहे. यावर्षीपासूनच दोन टर्मममध्ये होणार CBSE ची परीक्षा. 90 मिनिटांच्या परीक्षेत असणार बहुपर्यायी प्रश्न. 50-50 टक्के प्रतिशत सिलेबसनुसार दोन भागात म्हणजेच दोन टर्ममध्ये होणार परीक्षा. ( CBSE Board Exams 2021-22: Class 10, 12 board exams to be held in two terms) पहिल्या टर्मची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये असणार आहे. तर दुसऱ्या टर्मची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 च्या 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षांची योजना सीबीएसईने केली आहे. अंतर्गत मूल्यांकन (Internal Assessment) आणि प्रोजेक्ट वर्क (Project Work) . सीबीएसईचे शिक्षक जोसेफ इमैनुएल यांनी दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण वर्ष 2021-22 करता पाठ्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. दोन टर्ममध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक टर्मच्या शेवटी बोर्ड परीक्षा घेतली जाणार आहे. 


२०२१ मध्ये करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच २०२२ च्या परीक्षांसाठी बोर्डाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सीबीएसईनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर  २०२२ बोर्ड परीक्षांसाठी विशेष स्कीम तयार केली जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांना दोन सत्रात विभागण्यात येणार आहे. दोन्ही सत्रांच्या अखेरीस परीक्षा होतील. दोन्हीचा अभ्यासक्रमदेखील वेगवेगळा असेल.


अशी असणार टर्म 1 ची परीक्षा? 


फर्स्ट टर्मच्या शेवटी बोर्ड टर्म-१ परीक्षा घेईल. ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ या दरम्यान असेल. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एमसीक्यू आणि रीजनिंग टाइप एमसीक्यू देखील विचारले जातील. प्रत्येक पेपर ९० मिनटांचा असेल. यात टर्म-१ च्या सिलॅबसमधूनच प्रश्व विचारले जातील. म्हणजेच संपूर्ण ५० टक्के सिलॅबसच्या ५० टक्के भागावरचे प्रश्न विचारले जातील.


क्वेश्चन पेपर्स सीबीएसईच पाठवणार. विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकत असतील, त्याच शाळेत परीक्षा होईल. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी सीबीएसई बोर्डाद्वारे एक्स्टर्नल सेंटर सुपरिटेंडंट्स आणि ऑब्जर्व्हर्स नियुक्त केले जातील. स्टुडंट्स ओएमआर शीट वर उत्तरे देतील. स्कॅन करून सीबीएसईच्या पोर्टल वर अपलोड केले जाईल. किंवा शाळा मूल्यांकन करून सीबीएसई पोर्टलवर अपलोड करतील. अंतिम निर्णय बोर्डाद्वारे शाळांना सूचित केला जाईल.


असा असणार टर्म-2 परीक्षेचा पॅटर्न?


टर्म-2 या इयर एंड परीक्षेचे आयोजनदेखील सीबीएसई द्वारेच केलं जाईल. उर्वरित ५० टक्के सिलॅबसमधूनच प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाईल. पेपर २ तासांचा असेल. या विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच एमसीक्यू, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असतील.


करोनामुळे परिस्थिती सामान्य झाली नाही तर, टर्म-2 परीक्षा देखील ९० मिनिटांची असेल. टर्म-1 प्रमाणेच केवळ एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातील. दोन्ही टर्म्सचे गुण विद्यार्थ्यांच्या एकूण बोर्ड निकालात समाविष्ट केले जातील.