मोठी बातमी! केंद्र सरकारकडून 35 औषधांवर घातली बंदी; यामध्ये कोणत्या औषधांचा समावेश

अनियमिततेमुळे रुग्णांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असा इशारा ड्रग कंट्रोलर जनरलने दिला

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 17, 2025, 10:03 AM IST
मोठी बातमी! केंद्र सरकारकडून 35 औषधांवर घातली बंदी; यामध्ये कोणत्या औषधांचा समावेश

केंद्र सरकारने आता देशभरात वैज्ञानिक चाचणी आणि मंजुरीशिवाय उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या FCD (फिक्स्ड कॉम्बिनेशन डोस) औषधांवर मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना 35अमान्य एफसीडी औषधांचे उत्पादन आणि विपणन तात्काळ थांबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या एफसीडी औषधांमध्ये वेदनाशामक, मधुमेह औषधे, उच्च रक्तदाब औषधे, मज्जातंतू वेदना औषधे, प्रजनन औषधे आणि पौष्टिक पूरक आहार यांचा समावेश आहे. माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. राजीव सिंह रघुवंशी यांच्या हवाल्याने जारी केलेल्या निर्देशात असे म्हटले आहे की काही एफडीसी औषधांना त्यांच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे वैज्ञानिक मूल्यांकन न करता राज्य पातळीवर परवाने देण्यात आले आहेत, जे सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका आहे.

अशा अनियमिततेमुळे रुग्णांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असा इशारा ड्रग कंट्रोलर जनरलने दिला आहे. ही औषधे औषधांच्या प्रतिक्रिया, औषधांच्या परस्परसंवाद आणि गंभीर आरोग्य धोके निर्माण करू शकतात कारण ती वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाहीत. सीडीएससीओने राज्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, 35 सूचीबद्ध एफडीसी औषधांसह इतर सर्व अमान्य एफडीसी औषधांचे उत्पादन, वितरण आणि विक्री तात्काळ थांबवावी. तसेच, या औषधांविरुद्ध चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करावी.

नियमांचे पालन करा

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना त्यांच्या FDC मंजुरी प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याचे आणि कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. औषध नियामक सर्वोच्च संस्था CDSCOने 35 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात एफडीसी औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातलीय.. वेदनाशामक, पोषणसंबंधी पूरक आहार आणि मधुमेह औषधांचा यात समावेश असून, याच्या बंदीबाबत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना निर्देश देण्यात आलेत. FDC ही अशी औषधं आहेत, ज्यात एका निश्चित प्रमाणात दोन किंवा अधिक फार्मास्युटिकल घटकांचा वापर केलेला असतो. काही FDC औषधांना सुरक्षा आणि परिणामकारकतेच्या पूर्व मूल्यांकनाशिवाय उत्पादन, विक्री आणि वितरणाचे परवाने देण्यात आले होते. त्यामुळे लोकांचं आरोग्य आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाला होता. अशा औषधांवर ही कारवाई करण्यात आलीय.