Pre Wedding Fact Check: लग्नाआधीच पार्टनरबाबत 'ही' गोष्ट जाणून घ्या, नंतर खटके उडणार नाहीत...

 तुम्हीही लग्नाचा विचार करत असाल तर सर्वसाधारणपणे तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी कोणकोणत्या गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे? जाणून घेऊयात

Updated: Sep 4, 2022, 11:10 AM IST
Pre Wedding Fact Check: लग्नाआधीच पार्टनरबाबत 'ही' गोष्ट जाणून घ्या, नंतर खटके उडणार नाहीत... title=

Check these things before marriage: तुम्हीही लग्नाचा विचार करत असाल तर सर्वसाधारणपणे तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी कोणकोणत्या गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे? पार्टनरच्या घरची पार्श्वभूमी काय? पार्टनरच्या आवडीनिवडी काय? पार्टनरच्या स्वभाव कसा आहे? पार्टनरच्या आरोग्यबाबतची माहिती? या गोष्टी सर्वसाधारणपणे जाणून घेतल्या जातात, अगदी पार्टनरच्या पगाराबाबतही माहिती घेतली जाते. मात्र अशी आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याबाबत फारसं विचारलं जात नाही, किंवा चर्चाही होत नाही. 

कर्ज परतफेडण्याची क्षमता: 

सहसा लग्न ठरवताना तुमच्या पार्टनरची कर्ज परतफेड करण्याची क्षमता कुणीही विचारात घेत नाही. ही एक अशी गोष्ट आहे ज्याबाबत सहसा लक्षच दिलं जात नाही. लग्नानंतर हळूहळू सर्व गोष्टी समजत जातात आणि नंतर भांडणं किंवा खटके उडण्यास सुरूवात होते. 

परदेशात यावरूनही लग्न तुटतात 

भारतापेक्षा परदेशातील माणसं आर्थिक गोष्टींबाबत अधिक सजग असतात असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. परदेशात लग्नाआधीचं पार्टनरचं फायनान्शियल डिसिप्लिन कसं आहे याबाबत विचारपूस केली. अनेकदा याबाबत खातरजमा देखील केली जाते. अनेकदा परदेशात पार्टनरचा Cibil Score खराब असल्यास लग्न तुटतं देखील. 

आर्थिक सवयी जाणून घेणं गरजेचं 

लग्नाआधी आपल्या पार्टनरच्या आर्थिक सवयी जाणून घेणं गरजेचं आहे. एक कपल म्हणून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तुमची क्रेडिट हिस्ट्री शेअर केली पाहिजे. यावरून तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या आर्थिक सवयींबाबत संपूर्ण माहिती समजू शकेल.

सिबिल स्कोअर म्हणजे काय? CIBIL Score And CIR 

सिबिल स्कोअर म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट.  या सविस्तर रिपोर्टमध्ये तुम्ही कधी कर्ज घेतलं, तुम्ही वेळेवर कर्ज परतफेड केली का? तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहेत? तुम्ही किती EMI वेळेवर भरलेत किती उशिरा भरले, याबाबत सर्व माहिती यामध्ये लिहिलेली असते. 

हा रिओपर्ट तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात. अवघ्या पाच मिनिटात तुम्हाला ही माहिती मिळू शकते. 

check financial history and CIBIL score of your partner before marriage