Prasanna Shankar Dhivya Shashidhar: घटस्फोट आणि मुलाचा ताबा मिळवण्यासाठी सुरु असलेल्या लढाईदरम्यान रिपलिंग (Rippling) कंपनीचा सह-संस्थापक प्रसन्ना शंकरने (Prasanna Sankar) पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरुन खळबळ उडाली असताना आता त्याने आणखी आरोप केले आहेत. प्रसन्नाने एकामागोमाग अनेक पोस्ट शेअर करत सगळा घटनाक्रम सांगितला होता. तसंच पत्नीने आपल्याला लैंगिक विकृत असल्याचा आणि आपल्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप केला असल्याची माहिती दिली होती. .
प्रसन्नाने कायदेशीर वादाबद्दल सार्वजनिकरित्या माहिती दिल्यानंतर दिव्याने हे आरोप केले होते. घटस्फोटाच्या निर्णयावर नाराज असल्याने पत्नी पोलिसांचा वापर करून त्यांना त्रास देत असल्याचाही आरोप तिने केला होता. पत्नीने सिंगापूरमध्ये त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि तिचे नग्न व्हिडिओ लीक करणे यासह अनेक खटले दाखल केले होते. परंतु पोलिसांना ते खोटे असल्याचे आढळले होते अशी माहितीही त्याने दिली होती.
त्यातच प्रसन्नाने आता त्यांच्या वकिलांमध्ये व्हॉट्सअॅप झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आणि ईमेल यांचेही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने पत्नीने सिंगापूरहून मुलाचं अपहरण करुन अमेरिकेत नेल्याचा आणि त्याच्या वडिलांनी त्याला सोडून दिले आहे असं मानण्यासाठी ब्रेनवॉश केल्याचा आरोप केला आहे.
एका स्क्रीनशॉटमध्ये त्याने दावा केला आहे की, आपण मुलाचं अपहरण केल्याचा तिचा दावा खोटा आहे. पत्नीने परस्पर मान्य केलेल्या अटींनुसार मुलाला तिच्या घरातून कधी न्यायचं हे स्वेच्छेने सांगितलं होतं असं त्याने सांगितलं आहे.
Anoop's wife sent me the message my wife had sent Anoop and hotel bookings she made for him. pic.twitter.com/0gs1mMBc6d
— Prasanna S (@myprasanna) March 23, 2025
त्याने अमेरिकेतील त्यांच्या वकिलांमध्ये झालेल्या ईमेलच्या माध्यमातून झालेल्या चर्चेचा स्क्रीनशॉटही जोडला आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी भारतात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास आणि मुलाचा ताबा सामायिक करण्यास सहमती दर्शविली असल्याचं दिसून येत आहे. ईमेलमध्ये मालमत्तेच्या विभाजनाची तपशीलवार माहिती देण्यात आली होती आणि दिव्याला प्रती महिना 5 हजार डॉलर्सची मदत मिळावी असं म्हटले होते. प्रसन्ना मुलाचा सर्व खर्च उचलणार होता आणि 50/50 पालकत्व योजना असणार होता. प्रसन्नाचं म्हणणं आहे की, हे पत्नीच्या दाव्याच्या विरोधात आहे की त्यांनी तिला तिच्या इच्छेविरुद्ध करारावर स्वाक्षरी करण्यास जबरदस्ती केली होती.
त्याने दिव्याला सिंगापूरहून भारतात येण्यास भाग पाडल्याच्या दाव्यालाही आव्हान दिलं आहे. त्याने न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत शेअर केली आहे, ज्यामध्ये दिव्याला मूल परत करण्याचे आदेश देण्यात आले होते असे दिसते.
चेन्नईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने आपल्या पतीला लैंगिक विकृत म्हटलं आहे, जो लपून महिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असे. यासाठी त्याला सिंगापूरमध्ये जेलमध्येही जावं लागलं होतं असा दावा तिने केला आहे.
तिने सिंगापूर पोलिसांसमोरही असाच आरोप केला होता पण त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही आणि त्यांनी सर्व आरोपांमधून मुक्त केले, असा दावा प्रसन्नाने केला आहे. "तिने वॉशिंग्टनमध्ये पुन्हा माझ्यावर हे आरोप केले. पुन्हा एकदा न्यायाधीशांनी माझ्या बाजूने निकाल दिला," असंही त्याने सांगितलं आहे.
कर चुकविण्यासाठी वैवाहिक मालमत्ता त्याच्या वडिलांच्या नावावर हस्तांतरित केल्याच्या आरोपावर प्रसन्नाने म्हटलं आहे की ते रिप्लिंगमधील त्याचे शेअर्स होते, ही कंपनी त्याने सह-स्थापना केली होती आणि तिचा त्यात कोणताही सहभाग नव्हता. त्याने पुढे असा दावा केला की त्यांचा मुलगा सिंगापूरमधील सर्वोत्तम शाळेत शिकला होता. पण दिव्याने त्याचं अपहरण" केलं आणि त्याला एका सार्वजनिक शाळेत टाकलं.
"तिने घटस्फोटाला दुजोरा देण्यासाठी अमेरिकेत 5 महिन्यांसाठी मुलाचं अपहरण केलं. त्याला 5 सार्वजनिक शाळेत टाकलं. माझ्यासोबतचे सर्व संपर्क तोडले. वडील तुला सोडून गेले आहेत सांगत ब्रेनवॉश केलं. मी त्याला लिहिलेलं पत्रही त्याला देऊ दिलं नाही. ती फार कठोर वेळ होती," असं प्रसन्नाने सांगितलं आहे.
उद्योजकाने मुलाला त्याच्या आईकडे परत करण्यास एका अटीवर सहमती दर्शविली की ती पुन्हा त्याचं अपहरण करणार नाही. करारानुसार, त्याला त्याच्या मुलाचा पासपोर्ट संयुक्त लॉकरमध्ये सुरक्षित ठेवायचा आहे आणि 50 -50 टक्के कस्टडी प्लॅननुसार मुलाला परत करायचे आहे.
प्रसन्नाने एक्सवर एकामागोमाग एक पोस्ट शेअर केल्यानंतर हा वाद उघडकीस आला होता. पत्नीचे प्रेमसंबंध होते, ज्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला असा गौप्यस्फोट त्याने केला. त्याने सोबत पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते.