Parliament Cash Row Abhishek Manu Singhvi: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून यादरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी काल सभागृह स्थगित झाल्यानंतर सीट क्रमांक 222 च्या खाली नोटांचं बंडल सापडल्याची माहिती दिली. ही सीट काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींच्या (Abhishek Manu Singhvi) नावे आहेत. दरम्यान, अभिषेक मनु सिंघवी यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की, "मी याबद्दल ऐकूनच हैराण आहे. मी याबद्दल कधीच ऐकलेलं नाही. मी काल दुपारी 12.57 ला सभागृहात दाखल झालो होतो. सभागृह दुपारी 1 वाजता स्थगित झालं होतं. यानंतर दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत मी अयोध्याचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासह कँटीनमध्ये जेवायला बसलो होतो. दुपारी 1.30 वाजता मी सभागृहात गेलो. यामुळे मी काल सभागृहात 3 मिनिट आणि कँटीनमध्ये 30 मिनिट होतो. या मुद्द्यांचं राजकारण केलं जातं याचं मला फार विचित्र वाटतं. लोक कुठेही आणि कोणत्याही सीटवर काहीही ठेवून जातात याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे".
अभिषेक मनु सिंघवी यांनी पुढे सांगितलं आहे की, "याचा अर्थ आमच्यापैकी प्रत्येकाकडे एक सीट असली पाहिजे आणि ती सीट लॉक करता आली पाहिजे. चावी सोबत नेण्याची परवानगी असावी, अन्यथा कोणी काहीही करु शकतं आणि यावरुन आरोप लावू शकतं. जर हे दु:खद आणि गंभीर नसतं तर हास्यास्पद असतं.मला वाटतं याच्या मुळाशी जाण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे. जर सुरक्षा यंत्रणांमध्ये काही त्रुटी असेल तर त्यादेखील उघड करायला हव्यात". मी जेव्हा कधी सभागृहात जातो तेव्हा 500 रुपयेच घेऊन जातो असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
राज्यसभा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात अचानकपणे राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी सर्व सदस्यांच्या निदर्शनास एक घटना आणून दिली. काल रात्री संसदेतील सुरक्षा कर्मचारी तपासणी करत असताना 222 क्रमांकाच्या सीटखाली काही नोटांचं बंडल आढळलं. या नोटा काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या सीटखाली सापडल्याचं सभापतींनी सांगितलं. या नोटा ख-या आहेत की खोट्या आणि नोटा राज्यसभेत कशा आल्या यावर चौकशी करणे गरजेचं असल्याचं सभापतींनी सांगितले आणि चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान ही संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी घटला असल्याचं सांगून जे पी नड्डा यांनी काँग्रेस खासदारांवर आरोप केले. तर कांग्रेस खासदार असं कृत्य करणार नसल्याचा मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.