कर्नाटकात मंत्रीपदाच्या वाटपावरुन काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद

काँगेसमध्येच मंत्रीपदावरुन अंतर्गत वाद

Updated: May 29, 2018, 08:39 PM IST
कर्नाटकात मंत्रीपदाच्या वाटपावरुन काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार बनल्यानंतर आता दोघांमध्ये मंत्रीपदाच्या विभागावरुन मतभेद सुरु झाले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक देखील झाली पण कोणताही निष्कर्ष निघाला नाही. दोन्ही पक्षाचे नेते दावा करताय की लवकरच हे मतभेद सोडवले जातील. मंत्रीमंडळात सहभागी होण्यासाठी काँग्रेसमध्येच वाद सुरु आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी, दानिश अली आणि एचडी रेवन्ना, अहमद पटेल, डीके शिवकुमार, मल्लिकार्जुन खडगे, सिद्धरमैया, केसी वेणुगोपाल आणि जी परमेश्वर उपस्थित होते.

दोन्ही पक्षांना पाहिजे मोठे विभाग

सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षांना वित्त आणि गृह यासारखे मोठे विभाग हवे आहेत. बैठकीआधी वेणुगोपाल यांनी म्हटलं होतं की, कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये एक-दोन दिवसात मंत्रीपदाबाबत निर्णय होईल. अध्यक्ष राहुल गांधी परदेशात असल्याने यावर कोणताही फऱक नाही पडणार असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

मुलांसाठी मंत्रीपदाची मागणी

कर्नाटकमध्ये अनेक दिग्गज नेते आपल्या मुलांसाठी मंत्रीपदाची मागणी करत आहेत. यामध्ये काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खडगे आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा देखील समावेश आहे. सरकारमध्ये काँग्रेसला 22 तर जेडीएसला 12 मंत्रीपदं मिळणार आहेत.