देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत आहे.

Updated: Jul 16, 2020, 11:08 AM IST
देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ title=

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांची संख्याही वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनावर मात करुन आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत, 20783 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63 टक्क्यांवर पोहोचला आहे.

पण देशात कोरोनाचा संसर्गही झपाट्याने होत आहे आणि दररोज नवनवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 32695  कोरोना रुग्ण वाढले आहेत. जी एका दिवसात वाढलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 9,68,876 वर पोहचली आहे.

देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा देखील वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 24 तासांत कोरोनामुळे 606 रुग्णांचा बळी गेला आहे. देशभरात आतापर्यंत 24915 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना रूग्णांची टेस्टिंगचं प्रमाण वाढलं आहे. देशात दररोज 3 लाखांहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. बुधवारी सलग दुसर्‍या दिवशीही देशभरात कोरोनाच्या 3 लाखाहून अधिक चाचण्या नोंदवल्या गेल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या माहितीनुसार बुधवारी देशात एकूण 3.26 लाखाहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत देशात 1.27 कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यूएसए आणि रशिया नंतर भारत हा जगातील सर्वात मोठा कोरोना चाचणी करणारा देश आहे. चाचणीच्या बाबतीतही भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे.

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1.36 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 5.86 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 80.37 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. जगात कोरोनाचे सर्वाधिक प्रमाण अमेरिकेत आहे. जेथे 36.16 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि 1.40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये 19.70 लाखांहून अधिक कोरोना संक्रमित आहेत तर 75 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रशियामध्येही 7.46 लाखाहून अधिक कोरोना संक्रमित आहेत. तर 11 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.