बंगळुरु : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाने ट्विटरला काँग्रेस पक्ष (Congress party) आणि भारत जोडी यात्रेची Twitter खाती तात्पुरती ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. कॉपीराइट नियमांचं (Copyright Law) उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने MRT म्युझिकच्या कॉपीराइट म्यूझिकचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआरटी म्युझिकने राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना अद्याप आदेशाची प्रत मिळालेली नाही. काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना बंगळुरू उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत सोशल मीडियावरून माहिती मिळाली आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी पक्षकाराच्या वतीने कोणीही न्यायालयात उपस्थित नव्हते. या प्रकरणाबाबत आम्ही आमच्या स्तरावर कायदेशीर सल्ला घेत आहोत.



बंगळुरूच्या एका न्यायालयाने ट्विटरला KGF Chapter-2 चित्रपटाच्या साउंड रेकॉर्डचा बेकायदेशीरपणे वापर करून MRT म्युझिकच्या मालकीच्या वैधानिक कॉपीराइटचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रा यांची खाती तात्पुरती ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.