Crime News : 40 वर्षीय एका मुलाच्या आईवर जडला 14 वर्षीय मुलाचा जीव! शेतात शारीरिक संबंध ठेवायला गेला अन् त्यानंतर जे घडलं...

Crime News :  एका 14 वर्षीय मुलाचा जीव 40 वर्षीय एका मुलीच्या आईवर जडला. त्यानंतर शेतात शारीरिक संबंध ठेवायला गेला आणि धक्कादायक प्रकार घडला.  

नेहा चौधरी | Updated: Nov 9, 2025, 05:42 PM IST
Crime News : 40 वर्षीय एका मुलाच्या आईवर जडला 14 वर्षीय मुलाचा जीव! शेतात शारीरिक संबंध ठेवायला गेला अन् त्यानंतर जे घडलं...

Crime News : एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 14 वर्षीय मुलगा एक आई असलेल्या 40 वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला. त्यानंतर जे काही घडलं ते अतिशय भयावह आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतात या नववी शिकणाऱ्या मुलाने या विवाहित मुलीच्या अंगावर हात टाकला. तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न या अल्पवयीन मुलाने केला. महिलेने विरोध केल्यानंतर त्या मुलाने त्या महिलेवर जीवघेणा हल्ला केला ज्यात महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात घडली आहे. (Crime News 14 year old boy love with 40 year old boy mother He went to have physical relation in the field )

Add Zee News as a Preferred Source

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 3 नोव्हेंबरला घडली. मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही 3 नोव्हेंबर रोजी घडली. पीडित महिला तिच्या शेतात काम करत असताना नववी इयत्तेत शिकणाऱ्या एका तरुणाने तिच्यावर अंगावर हात टाकला. आरोपी अल्पवयीन मुलाने महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने त्याला विरोध केला असता आरोपी संतापला आणि त्याने तिच्यावर कोयता आणि दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पीडित महिला गंभीररित्या जखमी झाली.  

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, तिथल्या गावकऱ्यांना पीडित महिला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर, तिला तातडीने चंडीगड येथील एका रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान, पीडित महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी प्रकरणाचा तपास केला असता हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला त्यांनी घटनास्थळावरून बऱ्याच संशयास्पद वस्तू आणि हल्ल्यात वापरण्यात आलेली हत्यारे आढळले असून त्यांनी ते ताब्यात घेतलंय. 

पोलिसांनी प्रकरणातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून कठोर चौकशीदरम्यान, 14 वर्षीय आरोपीने आपला गुन्हा कबुली दिली आहे. त्यानंतर, आरोपी अल्पवयीन असल्या कारणाने त्याला बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मृत महिलेला 17 वर्षांचा एक अपंग मुलगा असून पीडिता एकटीच आपल्या मुलाला सांभाळ करत होती. दरम्यान आता गावकऱ्यांनी त्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More