)
IPS officer suicide case : हरियाणातील वरिष्ठ पोलीस अधिकारी वाय. पूरण कुमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तीन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांसह 10 आयपीएस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळं संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ माजली आहे. आयपीएस अधिकाऱ्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्यानंतर त्यांच्याजवळ एक 8 पानी चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टींची माहिती देत पत्नीचाही उल्लेख केला होता.
वाय पूरण कुमार यांच्या या चिठ्ठीनुसार हरियाणा पोलीस दलाच्या सेवेत असणारे 9 आयपीएस अधिकारी, एक माजी आयपीएस आणि 3 माजी आयएएस अधिऱ्यांची नावं घेत धक्कादायक खुलासे केले. कुमार यांनी वयाच्या 52 व्या वर्षी चंदीगढ येथे आपल्या राहत्या घरी आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. यादरम्यान त्यांची पक्नी आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार कामानिमित्त जपान दौऱ्यावर गेल्या होत्या.
बुधवारी त्या परतल्या तेव्हा घडला प्रकार पाहून त्यांनी हरियाणातील पोलीस महानिदेशक (डिजीपी) शत्रुजीत कपूर आणि रोहतक पोलीस अधिक्षक (एसपी) नरेंद्र बिजारिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याती मागणी करत पोलिसांत तक्रार केली. आपल्या पतीविरोधात वरील अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे पेरत त्यांना एका अतिशय तुच्छ प्रकरणात अडकवलं, हा एक पूर्वनियोजित कट होता असा आरोप अमनीत कुमार यांनी केला.
सदर प्रकरणी चंदीगढ पोलिसांनी घटनास्थळावरून आपल्याला एक मृत्यूपत्र आणि शेवटची चिठ्ठी सापडल्याची पुष्टी केली. ज्यामध्ये त्यांनी सर्व संपत्ती पत्नीच्या नावे केल्याचं स्पष्ट केलं. तर, पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचंही सांगितलं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वाय. पूरन कुमार यांनी प्रशासकीय कारभार आणि आपल्या काही समस्याही चिठ्ठी अधोरेखित केल्याचं म्हटलं.
अनुसूचित जात प्रवर्गातील असणाऱ्या पूरन कुमार यांनी आठ पानांची अखेरची चिठ्ठी लिहिली, ज्यामध्ये त्यांनी जातीचा उल्लेख करत 'ऑगस्ट 2020 पासून हरियाणातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्यानं जातीय भेदभाव, आकस ठेवून मानसिक छळ, जाहीर अपमान आणि अत्याचार केला जो आता सहन करण्यापलिकडला आहे', असं लिहित आपल्या मनातील घालमेल शब्दांत मांडली. आपल्यासोबक घडलेल्यामा मानसिक आणि प्रशासकीय छळाची माहिती देत सातत्यानं आपला अपमान होत राहिला, सुट्टी नाकारली जाऊ लागली, ज्यामुळं वडिलांना मरणासन्न अवस्थेत असतानाही भेटता आलं नाही, आपल्याला अस्तित्वहिन पदांवर नियुक्त करण्यात आल्याचा खुलासाही केला.
कुमार हे आयपीएस अधिकारी असून, ते पोलीस प्रशिक्षण केंद्र सुनारिया- रोहतक इथं महानिरीक्षकपदी सेवेत रुजू होत. आयपीएस अधिकाऱ्यांसम वागणू आपल्याला मिळावी यासंदर्भातील मुद्दा त्यांनी उचलून धरत अनेकदा त्या धर्तीवर तक्रार आणि विनंतीपत्र दाखल केल्याचाही दावा केला जाकत आहे. आपल्यासोबत सातत्यानं आणि वेळोवेळी भेदभाव करण्यात आला, अपमानित करत खोटी कारवाई आपल्याविरोधात करण्यात आली आणि हा सर्व प्रकार सहन होण्यापलिकला आहे, असं कुमार यांनी चिठ्ठीत लिहीत आपण हतबल झाल्याचं म्हटलं.
चिठ्ठीतील अखेरच्या चार पानांमध्ये त्यांनी वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांसह इतर कथित नोकरशाहांच्या भूमिकांवर भाष्य केलं, ज्या व्यव्यक्तींवर त्यांनी मानसिक आणि प्रशासकीय छळ केल्याचा आरोप केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमनीत कुमार अर्थात वाय. पूरन कुमार यांच्या पत्नीनं त्यांच्याशी संवाद साधला होता. स्वत:वर गोळी झाडून घ्यायच्या तासाभरापूर्वीच त्यांनी एकमेकांशी संवाद साधला होता, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी मुलीशीसुद्धा दप्पा मारल्या. जेव्हा त्या मेट्रो ट्रेननं प्रवास करत होत्या. संवाद साधताना ते कोणत्याही तणावाच्या परिस्थितीत दिसले नाहीत. दरम्यान सदर प्रकरणात रितसर गुन्ह्याची नोंद होत नाही, तोवर शवविच्छेदन होऊ देणार नाही असं म्हणत पतीच्या मृत्यूस जबाबदार असणारी माणसं अशी निर्भीडपणे कशी वावरू शकतात? असा उद्विग्न करणारा प्रश्नही अमनीत कुमार यांनी उपस्थित केला.
वाय. पूरण कुमार यांनी आत्महत्येपूर्वी कोणत्या आरोप केले?
वाय. पूरण कुमार यांनी 8 पानांची चिठ्ठी लिहिली, ज्यात हरियाणा पोलीस दलातील 9 आयपीएस अधिकारी, एक माजी आयपीएस आणि 3 माजी आयएएस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
आत्महत्येची घटना कधी आणि कुठे घडली?
52 वर्षीय वाय. पूरण कुमार यांनी चंदीगड येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांची पत्नी आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार त्या वेळी जपान दौऱ्यावर होत्या. बुधवारी परतल्यावर त्यांना ही घटना समजली.
अमनीत कुमार यांनी कोणती तक्रार केली?
अमनीत कुमार यांनी हरियाणा पोलीस महानिदेशक (डीजीपी) शत्रुजीत कपूर आणि रोहतक पोलीस अधिक्षक (एसपी) नरेंद्र बिजारिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.