)
Crime News : उत्तर प्रदेशातील हापूडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका खून प्रकरणात अतिशय भयानक कारण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह आई वडिलांचा खून केल्याचा समोर आलं आहे. या हत्याकांडामागील कारण समोर आल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. या व्यक्तीने पत्नीसह आई वडिलांचा खून केला तर पोलीस तपासात असंही समोर आलं की त्या व्यक्तीने चार लग्न केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने पत्नी, आई आणि वडिलांचा विमा काढला होता. आपण जीवन विमा पॉलिसीमुळे अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळते. मात्र या विमाचे पैसे मिळवण्यासाठी या व्यक्तीने पत्नी, आई आणि वडिलांची हत्या केली. पोलिसांनी हत्याकांडाचा तपास केला करताना असं समोर आलं की, विशाल नावाच्या व्यक्तीने 2018 ते 2023 दरम्यान जवळपास 64 विमा पॉलिसी
मुख्य आरोपी विशाल सिंघल याचे एकेकाळी माफक उत्पन्न असलेले कुटुंब होतं. त्याचे वडील मुकेश सिंघल फोटो स्टुडिओ चालवत होते आणि कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम 25,000 रुपये होते. अचानक, काही वर्षांतच त्याच्या नावावर 64 विमा पॉलिसी काढण्यात आल्यात. ज्यांची एकूण किंमत 100 कोटींहून अधिक होती. शिवाय, त्याने लक्झरी कार आणि मोटारसायकली खरेदी केल्या, ज्यामुळे विमा कंपन्यांमध्ये संशय निर्माण झाला.
22 जून 2017 रोजी, विशालची आई प्रभा देवी यांचे हापूर इथे एका रस्ते अपघातात निधन झाले. एफआयआरमध्ये म्हटलंय की, दुचाकीवरून जात असताना तिला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. विशालला किरकोळ दुखापत झाली आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी हा रस्ता अपघात मानून खटला बंद केला, त्यानंतर विशालने 25 लाख रुपयांचा विमा दावा केला. ज्याचे पैसे त्याला मिळालेत.
त्यानंतर 2022 मध्ये, त्याची पहिली पत्नी एकता सिंघल हिचा गूढ मृत्यू झाला. उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारींमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका आठवड्यातच तिचा मृत्यू झाला. विशालने त्याच्या विमा कंपनीकडून 80 लाख रुपये मिळवलेत. नंतर, तपासात असे दिसून आले की हा मृत्यू आजारपणामुळे नव्हता तर पूर्वनियोजित खून होता.
1 एप्रिल 2025 रोजी, त्याचे वडील मुकेश सिंघल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. विशालने दावा केला की, रस्ते अपघातात झालेल्या दुखापतींमुळे त्यांचे निधन झालं. पण, तपासात असे दिसून आलं की मुकेशचा मृत्यू देखील अनैसर्गिक होता. त्याच्या वडिलांच्या नावावर 64 पॉलिसी होत्या आणि एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित होते. यामुळे पोलीस आणि विमा कंपन्यांमध्ये गंभीर संशय निर्माण झाला.
फेब्रुवारी 2024 मध्ये लग्न झालेल्या चौथ्या पत्नीने एका खळबळजनक विधानाने प्रकरणाला टर्निंग पॉइंट आलं. तिने सांगितलं की विशालने त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा कट रचण्यासाठी तिची मदत मागितली होती. तिने नकार दिल्यावर तिला मारहाण करण्यात करण्यात आली. या मारहाणीत तिचा पाठीचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला गेला. पत्नीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मेरठच्या एसएसपीकडे तक्रार केली, पण बराच काळ हा विषय कौटुंबिक बाब म्हणून फेटाळून लावण्यात आला होता.
विमा कंपन्यांनी वारंवार संशयास्पद दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. डिसेंबर 2024 मध्ये, आठ कंपन्यांनी मेरठच्या एसएसपीला एक पत्र पाठवले ज्यामध्ये विशालने त्याच्या वडिलांच्या नावावर 70 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पॉलिसी काढल्याचं म्हटलं होतं. हे मोठ्या प्रमाणात, पद्धतशीर फसवणूक असल्याचे वर्णन करण्यात आलं होतं. पण, स्थानिक पोलिसांनी ते गांभीर्याने घेतलं नाही.
अखेर, जेव्हा तपास संभल जिल्हा एएसपी अनुकृती शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला तेव्हा प्रकरणात एक एक धक्कादायक गोष्ट समोर येत होती. वैद्यकीय अहवाल, विमा कागदपत्रे आणि पोलीस फायली एकत्रित करून पुरावे गोळा करण्यात आले. आरोपी विशाल आणि त्याचा साथीदार सतीश कुमार यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांनीही त्यांच्या आई, वडील आणि पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
1: ही घटना कुठे घडली आणि मुख्य आरोपी कोण आहे?
उत्तर: ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात घडली. मुख्य आरोपी विशाल सिंघल आहे, ज्याने आपल्या आई, वडिल आणि पत्नीची हत्या विमा पैसे मिळवण्यासाठी केली. त्याचा साथीदार सतीश कुमार देखील अटकेत आहे.
2: हत्याकांडामागील मुख्य कारण काय आहे?
उत्तर: हत्याकांडाचे कारण विमा फसवणूक आहे. विशालने २०१८ ते २०२३ दरम्यान आई, वडील आणि पत्नीच्या नावावर ६४ विमा पॉलिसी काढल्या, ज्यांची एकूण किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक होती. त्याने लक्झरी कार आणि मोटारसायकली खरेदी केल्या, ज्यामुळे विमा कंपन्यांमध्ये संशय निर्माण झाला.
3: विशालच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती?
उत्तर: विशालच्या कुटुंबाचे माफक उत्पन्न होते. त्याचे वडील मुकेश सिंघल फोटो स्टुडिओ चालवत होते आणि कुटुंबाचे मासिक उत्पन्न सुमारे २५,००० रुपये होते. अचानक अशा मोठ्या विमा पॉलिसी काढण्यामुळे संशय वाढला.