Cyclone Ditwah LIVE location : 'दितवाह' चक्रिवादळामुळं समुद्रात निर्माण झालेले चक्राकार वारे कमकुवत झाले असले तरीही ते आता एका अतीतीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित झाले आहेत. ज्यामुळं तामिळनाडूच्या चेन्न्ई हवामान केंद्रानं पुढील 24 तासांसाठीचा अंदाज वर्तवत वादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीपासून 20 किमीच्याच किमान अंतरावर असा इशारा दिला आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार या चक्रीवादळाच्या धर्तीवर पुढील 24 तास सावधगिरीचे राहणार असून, किनारपट्टी भागांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
श्रीलंकेनंतर आता चक्रीवादळाची वाटचाल भारताच्या दिशएनं सुरू असून देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धुमाकूळही घातला आहे.
चक्रीवादळामुळे उत्तर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, आंध्र प्रदेशमध्ये वादळ प्रभावित क्षेत्रांतून 375 गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रसंगादरम्यान तामिळनाडूमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर IMD नं तामिळनाडू,पाँडेचेरी, आणि आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना रेड अलर्ट जारी करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे वादळ महाराष्ट्रापासून बरंच दूर असलं तरीही समुद्र किनारपट्टी भागांमध्ये त्याचा परिणाम दिसणार असून जोरदार लाटा उसळण्याचा अंदाज आहे. तर, विदर्भात या प्रणालीमुळं पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ आता तामिळनाडूच्या किनारी भागांकडे असून, पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पुढचे 24 तास अतिदक्षतेचे राहणार असून, हे वादळ तामिळनाडू आणि पाँडेचेरीच्या किनार पट्टीहून समांतर उत्तर दिशेला पुढे सरकरण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शक्यता आहे. ज्यामुळं आयएमडीनं तामिळनाडू, पुद्दुचेरी किनारपट्टी भाग, मन्नारची खाडी, कोमोरिन किनारपट्टी, दक्षिण आंध्र प्रदेश या भागांसाठी दक्षतेचा इशारा दिला आहे. वादळाच्या या स्थितीत ताशी 60 ते 80 किमीनं वाहणारे वारे 90 किमी प्रतितास इतका वेग गाठतील, ज्यामुळं समुद्रही खवळलेला असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.