Delhi Blast: दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाच्या धक्कादायक घटनेमुळे वापरलेल्या गाड्यांच्या व्यवहारात सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झालं. घाई घाईत कागदपत्रे न तपासता व्यवहार केल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकतात. शिवाय गाडी गुन्हेगारी कृत्यात वापरली गेल्यास जुना आणि नवा मालक दोघेही अडकू शकतात. रस्त्यावरील सुरक्षेसाठी प्रत्येकाने अनोळखी व्यक्तीकडून गाडी घेण्यापूर्वी काही महत्त्वाची पावले उचलावीत. याबद्दल जाणून घेऊया.
गाडी घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रे नीट पाहा. नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) विक्रेत्याच्या नावावर असावे. चेसिस आणि इंजिन क्रमांक गाडीशी मिळते का हे पडताळा. प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) आणि विमा वैध असावा. कर्ज असल्यास बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्या. कागदांमध्ये शंका आली तर तात्काळ व्यवहार थांबवा.
फक्त बाहेरूनच नव्हे, आतूनही तपासा. विश्वासू मेकॅनिककडून डॅशबोर्डखाली, सीटखाली, बूटमध्ये असामान्य वायर्स किंवा बदल शोधा. इंजिन आणि इंधन टाकीभोवती छेडछाड झाली का हे बघा. स्फोटक साहित्य लपवण्यासाठी असे बदल होऊ शकतात. मेकॅनिकच्या होकाराशिवाय गाडी घेऊ नका.
विक्रेत्याने गाडी दिल्यानंतर लगेच आरटीओत जाऊन आरसी नव्या मालकाच्या नावावर करावे. हस्तांतरण होईपर्यंत जुना मालक जबाबदार राहतो. उशीर झाला आणि गाडी गुन्ह्यात सापडली तर पोलिस तपासात अडकता येईल. विक्रीनंतर अर्जाचा पुरावा ठेवा आणि फॉलोअप करा.
दोघांनी एकमेकांची ओळखपत्रे, पत्ता पडताळा. व्यवहारात पूर्ण पारदर्शकता ठेवा.
जुन्या गाड्यांचा व्यवहार हा पैशाचा सौदा नव्हे, तर कायदेशीर आणि सुरक्षेची बाब असते हे लक्षात असू द्या. दिल्लीसारख्या घटनांनी आपल्याला सतर्क राहण्याची शिकवण दिली आहे. कागदपत्रे, फिटनेस आणि हस्तांतरण हे तीन मुख्य आधार आहेत. या पायऱ्या पाळल्याने गुन्हे किंवा अडचणीपासून वाचता येईल.
जुन्या गाडी घेण्यापूर्वी सर्वप्रथम संपूर्ण कागदपत्रे तपासा. नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) विक्रेत्याच्या नावावर असावे, चेसिस-इंजिन क्रमांक गाडीशी जुळावेत, प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) आणि विमा वैध असावा. कर्ज असल्यास बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्या. कागदांमध्ये शंका आली तर व्यवहार थांबवा.
दिल्ली बॉम्बस्फोटासारख्या घटनांमुळे गाडी आतून सुरक्षित आहे का हे पाहणे गरजेचे आहे. विश्वासू मेकॅनिककडून डॅशबोर्डखाली, सीटखाली, बूट स्पेसमध्ये असामान्य वायर्स किंवा बदल शोधा. इंजिन आणि इंधन टाकीभोवती छेडछाड झाली का ते बघा. स्फोटक साहित्य लपवण्यासाठी असे बदल होऊ शकतात. मेकॅनिकच्या समाधानाशिवाय गाडी घेऊ नका.
विक्रीनंतर लगेच खरेदीदाराला आरटीओत जाऊन आरसी आपल्या नावावर हस्तांतरित करायला सांगा. हस्तांतरण होईपर्यंत जुना मालक कायदेशीर जबाबदार राहतो. उशीर झाला आणि गाडी गुन्ह्यात सापडली तर पोलिस तपास होऊ शकतो. अर्जाचा पुरावा ठेवा आणि पाठपुरावा करा.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.