हायकोर्टच्या Virtual सुनावणीआधी वकिलाचा तोल सुटला, तिला जवळ ओढलं आणि... VIDEO VIRAL

Kissing Viral Video: ही घटना मंगळवारी 14 ऑक्टोबर 2025 रोजी घडल्याचे सांगितले जाते, जेव्हा न्यायालयाचे सत्र सुरू झाले नव्हते.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 15, 2025, 09:40 PM IST
हायकोर्टच्या Virtual सुनावणीआधी वकिलाचा तोल सुटला, तिला जवळ ओढलं आणि... VIDEO VIRAL
कोर्ट व्हायरल व्हिडीओ

Kissing Viral Video: व्हर्च्युअल सुनावणीशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम अशा प्लॅटफॉर्मवर तो प्रचंड चर्चेत आहे. हा व्हिडिओ कोणत्याही कायदेशीर युक्तिवादाशी संबंधित नाहीय. तर ऑनलाइन सत्र सुरू होण्यापूर्वी एका वकीलाच्या अयोग्य वैयक्तिक वर्तनामुळे या व्हिडीओची जास्त चर्चा होतेय. काय घडलाय नेमका प्रकार? 

Add Zee News as a Preferred Source

ही घटना मंगळवारी 14 ऑक्टोबर 2025 रोजी घडल्याचे सांगितले जाते, जेव्हा न्यायालयाचे सत्र सुरू झाले नव्हते आणि सर्वजण न्यायमूर्तींच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका सुनावणीआधीचा हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जातंय.

व्हिडिओमध्ये वकील आपल्या खोलीत कायद्याच्या पोशाखात बसलेला दिसतो, कॅमेरापासून काहीसा बाजूला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा फक्त एक भाग दिसतो. त्याच्या समोर साडी नेसलेली एक महिला उभी आहे. वकील तिचा हात ओढून तिला जवळ खेचतो. 

महिलेला संकोच वाटत असल्याचे आणि ती प्रतिकार करत असल्याचे दिसते, तरीही वकील तिला गालावर चुंबन देतो, आणि नंतर ती मागे सरकते.हा व्हिडिओ अवघ्या दोन तासांत 89.7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 

वकील आणि महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. नेटिझन्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील शशांक शेखर झा यांनी व्हिडिओ शेअर करत “दिल्ली उच्च न्यायालय” अशी कमेंट केली. 

Netizens react

“तो व्यक्ती न्यायाधीश नसून वकील आहे. हे न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या कोर्टचे आहे, आणि सत्र सुरू नव्हते, असे दिल्ली उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील कुमार दीपराज यांनी सांगितले. एका यूजर्सने मिश्किलपणे लिहिले, “यानंतर त्याला नक्कीच बढती मिळेल.”या प्रकरणाने ऑनलाइन सुनावण्यांमधील व्यावसायिक शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Netizens react

यापूर्वी जूनमध्ये गुजरात उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला व्हर्च्युअल सुनावणीत अशोभनीय वर्तनासाठी 1 लाख रुपये दंड आणि 15 दिवस सामाजिक सेवेची शिक्षा सुनावली होती.

FAQ

१. दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीचा व्हायरल व्हिडिओ नेमका काय आहे?

हा व्हिडिओ दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीशी संबंधित आहे, जो सोशल मीडियावर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) वाऱ्यासारखा पसरला आहे. यात कोणताही कायदेशीर युक्तिवाद दिसत नाही, तर ऑनलाइन सत्र सुरू होण्यापूर्वी एका वकीलाचे अयोग्य वैयक्तिक वर्तन दाखवले आहे. व्हिडिओत वकील कायदेशीर पोशाखात बसलेला दिसतो आणि एका साडी नेसलेल्या महिलेला जवळ खेचून तिच्या गालावर चुंबन देतो, ज्यामुळे ती संकोचलेली दिसते आणि मागे सरकते.

२. या व्हिडिओची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख काय आहे?

हा व्हिडिओ १४ ऑक्टोबर २०२५ रोजी मंगळवारी घडल्याचे सांगितले जाते, जेव्हा न्यायालयाचे सत्र सुरू झाले नव्हते आणि सर्वजण न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या आगमनाची वाट पाहत होते. दोन तासांत याला ८९.७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. वकील आणि महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. झी २४ तासने या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे वकील शशांक शेखर झा आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील कुमार दीपराज यांनी हा वकील असल्याचे सांगितले, न्यायाधीश नव्हे.

३. या घटनेचा काय परिणाम झाला आणि यापूर्वी अशी प्रकरणे घडली आहेत का?

या व्हिडिओने ऑनलाइन सुनावण्यांमधील व्यावसायिक शिस्त आणि नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया मिश्रित असून, काहींनी उपहास केला, तर काहींनी टीका केली. यापूर्वी जून २०२५ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने व्हर्च्युअल सुनावणीत अशोभनीय वर्तनासाठी एका व्यक्तीला १ लाख रुपये दंड आणि १५ दिवस सामाजिक सेवेची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणामुळे व्हर्च्युअल न्यायप्रक्रियेत शिस्तीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More