Delhi Blast: जमिनीवर कोणाचा हात पडला होता, तर कोणाची आतडी; दिल्ली स्फोटानंतर रस्त्यावर होतं भयाण चित्र

Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कार बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे भीती पसरली. या स्फोटाचा आवाज बराच दूरपर्यंत ऐकू आला.  

शिवराज यादव | Updated: Nov 10, 2025, 10:41 PM IST
Delhi Blast: जमिनीवर कोणाचा हात पडला होता, तर कोणाची आतडी; दिल्ली स्फोटानंतर रस्त्यावर होतं भयाण चित्र

Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. स्फोट इतका जोरदार होता की, दूरपर्यंत लोकांना त्याचा आवाज ऐकू गेला. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर आसपास उभ्या असणाऱ्या गाड्यांचाही चुरा झाला. या स्फोटाचे साक्षीदार असणाऱ्यांनी स्फोट अतिशय भयानक होता असं सांगितलं आहे. एका साक्षीदाराने सांगितलं की, आवाज इतका मोठा होता की आम्ही सर्वजण घाबरलो होता. आम्ही थोडं पुढे जाऊन पाहिलं असता कोणाचा हात पडला होता, तर कोणाचं आतडं जमिनीवर होतं. 

Add Zee News as a Preferred Source

साक्षीदाराने सांगितलं की, सर्वात आधी त्याने जमिनीवर आतडी पाहिली. ती पाहिल्यानंत त्याला ते असंच काहीतरी असेल असं वाटलं. पण नंतर पुढे गेला असता त्याला हात दिसला जो पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला. 

डेप्युटी चीफ फायर ऑफिसर एके मलिक यांनी सांगितलं की, "आम्हाला चांदणी चौक मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ तिथे सात युनिट्स पाठवले होते. 7 वाजून 29 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं".

1) स्फोट कुठे आणि केव्हा झाला: 

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारचा जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर आगीच्या ज्वाला निघाल्या आणि जवळपासच्या तीन-चार वाहनांना वेढले. प्राथमिक तपासानंतर, दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, संध्याकाळी 6.52 वाजता एक कार हळूहळू जात होती आणि सिग्नलला थांबली. त्या कारमध्ये स्फोट झाला.

2) मृतांची संख्या: 

आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 24 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या मेट्रो स्थानक आणि काही घरांच्या काचा फुटल्या.

3) दिल्लीत हाय अलर्ट जारी: 

सुरक्षेच्या दृष्टीने, दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. एनआयए टीम घटनास्थळी पोहोचली आहे. एनआयए फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिस आयुक्त देखील लाल किल्ला परिसरात उपस्थित आहेत. एनएसजी टीमनेही तपास सुरू केला आहे, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले जात आहेत.

4) अमित शाह यांना दिली स्फोटाची माहिती: 

दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून संपूर्ण घटनेची माहिती दिली. गृहमंत्रालय संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. गृहमंत्रालयानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांच्याकडून स्फोटाची माहिती घेतली आहे. दरम्यान, अमित शाह यांनी सांगितले की, हा स्फोट हुंडई i20 कारमध्ये झाला होता, ज्यामध्ये तीन जण होते. कारच्या मागील बाजूस स्फोट झाला. गृहमंत्री अमित शाह स्वतः घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले आहेत. 

5) धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवली: 

दिल्लीतील स्फोटानंतर, उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संपूर्ण देशाचं दिल्लीतील स्फोटावर लक्ष आहे. नोएडामध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे, 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More