AAP Transgender Candidate MCD Election 2022  : दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे. दिल्लीच्या राजकारणात नवी पहाट पाहायला मिळत आहे. AAPचे बॉबी किन्नर (Bobby Kinnar) विजयी झाले असून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एकता जाटव  यांचा पराभव केला आहे. (AAP Transgender Candidate Bobby Kinnar Win)


Delhi MCD Election 2022 Result LIVE : दिल्ली महापालिका निवडणूक निकाल अपटेड पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत यावेळी समाजातील उपेक्षित वर्गाने दार ठोठावले आणि त्यांनी विजयही मिळवला आहे. आम आदमी पार्टीने पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले आहे.  यामुळे दिल्लीच्या राजकारणात एक नवी सुरुवात झाली आहे.


 दिल्लीच्या निवडणुकीच्या राजकारणात एक नवी सुरुवात झाली आहे. बहुधा पहिल्यांदाच एखाद्या प्रमुख राजकीय पक्षाने ट्रान्सजेंडर उमेदवार दिला आणि विजयी झाला आहे. बॉबी नावाच्या 38 वर्षीय ट्रान्सजेंडरला आम आदमी पार्टीने सुलतानपुरी माजरा विधानसभा मतदारसंघातून सुलतानपुरी-ए प्रभागाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. आता जनतेनेही त्यांच्या बाजुने कौल दिला आहे.


अण्णांच्या आंदोलनातून बॉबीने पक्षात प्रवेश


जनतेने त्यांना तिकीट दिले असून जनताच आपल्याला विजयी करेल, असा विश्वास निवडणुकीपूर्वी बॉबी यांनी व्यक्त केला होता. आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत बाबीचे नावही होते. अण्णा आंदोलनापासूनच बॉबी पक्षाशी जोडले गेले होते आणि स्थानिक पातळीवर त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे पक्षाने त्यांना एमसीडी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले.


समाजसेवेच्या कार्यात सक्रिय 


बॉबी परिसरात समाजसेवेचे कार्य करत आहेत आणि उपेक्षित समाजातील तसेच समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या अडचणीत मदत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी स्वखर्चाने 15 मुलींची लग्ने करुन दिली आहेत. बॉबी हा हिंदू युवा समाज एकता अवाम दहशतवाद विरोधी समितीच्या दिल्ली युनिटचा अध्यक्ष आहे. गेली 15 वर्षे या संस्थेच्या माध्यमातून ते गरजू लोकांना मदत करत आहेत. बॉबी यांचे 9वी पर्यंत शिक्षण झाले आहे. कदाचित समाजसेवा करत असताना एक दिवस दिल्लीची सत्ताधारी आम आदमी पार्टी आपल्याला निवडणुकीचे तिकीट देईल, असे त्यांना वाटले नव्हते. असे ते आवर्जुन सांगतात.