Delhi Red Fort Blast : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटासंदर्भात दर दिवशी नवा खुलासा होत असून, त्यात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदची टॉप कमांडर शाहीनबद्दलची माहिची यंत्रणांना हादरा देऊन गेली आहे.
जैश-ए-मोहम्मदने तिला 'मॅडम सर्जन' हे कोड नेम देण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली. यूपी एटीएसच्या रडारवरही सध्या टीम ड. असून स्फोटातील संशयित आरोपी शाहीनचे डॉक्टर सहकारी टीम D मध्ये सक्रिय असल्याचं म्हटलं जात आहे.
जैश-ए-मोहम्मदला पाठवलेल्या संदेशात टीम D चा उल्लेख असून, शाहीनच्या चॅटबॉक्समध्ये टीम D चा उल्लेख होता. सर्व दहशतवाद्यांकडे संवाद साधण्यासाठी कोड शब्द होते. ज्यामध्ये दहशतवाद्यासाठी 'स्पेशलिस्ट' शब्द वापरला जात होता. आपसात संवाद साधण्यासाठी चॅटबॉक्समध्ये 'हृदयरोग तज्ज्ञ', 'नेत्ररोग तज्ज्ञ' आणि 'डॉक्टर' हे शब्द वापरले जात होते. टीम D मधील प्रत्येकाला वेगवेगळी कामे सोपवण्यात आली होती. सांकेतिक शब्दांमध्ये त्या कामांचा उल्लेख होता, पैशांची व्यवस्था करण्यासाठी 'ऑपरेशन तयारी' हा शब्द वापरण्यात आला, तर, लहान शस्त्रांसाठी 'औषधांचा साठा' हा शब्द वापरण्यात आला होता. "ऑपरेशन थिएटर" हा शब्द एखाद्या स्थळाचं, स्थानाचं वर्णन करण्यासाठी वापरण्यात आला होता.
टीम D जैश-ए-मोहम्मदच्या एका उच्च कमांडरच्या संपर्कात होती. या संपूर्ण कटकारस्थानांमध्ये शाहीनला मॅडम सर्जन हे नाव देण्यात आलं होतं. तर, ऑपरेशनमध्ये सहभागी शाहीनचे सर्व सहकारी आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांनी तिला मॅडम सर्जन असं संबोधलं असून, जैश-ए-मोहम्मदची हीच 'मॅडम सर्जन' ऑपरेशन हमदर्द करत होती.
तरुण मुस्लिम मुली आणि महिलांना सहानुभूती दाखवून दहशतवादात आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ऑपरेशनला ऑपरेशन हमदर्द असं नाव देण्यात आलं. ऑपरेशन हमदर्द तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आलं. पहिल्या श्रेणीमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुस्लिम मुली आणि महिलांचा समावेश होता आणि त्यांना पैशाचे आमिष दाखवून दहशतवादात ओढण्याची योजना आखण्यात आली होती.
दुसऱ्या श्रेणीमध्ये मुस्लिम मुली आणि महिलांचा समावेश होता ज्या सामान्यतः बुरखा घालत नव्हत्या आणि ज्यांच्या आकांक्षा उंचावल्या होत्या. त्यांना परदेशात घेऊन जाऊन स्वप्नांनी आमिष दाखवण्याची योजना होती. त्यांना आरामदायी जीवनाचे आश्वासन देण्यात येत होतं आणि तिसऱ्या वर्गात मुस्लिम मुली आणि महिलांचा समावेश होता ज्या त्यांच्या विचारसरणीत कट्टरपंथी होत्या आणि जिहादच्या मार्गावर सहजपणे ओढल्या जाऊ शकत होत्या.
दिल्ली स्फोटातील आणखी एक महत्त्वाचं नाव असणाऱ्या परवेझ अन्सारीबद्दलही धक्कादायक खुलासा शाहीननेच केला असून, तिचा धाकटा भाऊ परवेझ अन्सारी याचं ब्रेनवॉशिंग तिनंच केल्याचं उघड होत आहे. शाहीननेच तिचा भाऊ परवेझ याला दहशतवादाच्या मार्गावर आणत
पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशीही संपर्कात आणलं होतं.
परवेझ अन्सारी पूर्वी क्लीन-शेव्हन अर्थाक दाढी मिशा ठेवत नसे आणि तो पॅन्ट आणि शर्ट घालत असे. मात्र, कट्टरतावादात ब्रेनवॉश झाल्यानंतर त्याने लांब दाढी, कुर्ता पायजमा आणि टोपी घालण्यास सुरुवात केली. इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये परवेझचा पगार ₹1.70 लाख होता. पंजाब नॅशनल बँकेत परवेझचं खातं असून आता एटीएसनं बँकेकडून त्याच्या संपूर्ण खात्याची माहिती मागितली आहे. त्यामुळं यातून तपास नेमका कोणत्या दिशेला जातो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
दिल्ली लाल किल्ला स्फोटातील मुख्य संशयित कोण आहे आणि तिचे कोड नेम काय आहे?
मुख्य संशयित शाहीन आहे, जी जैश-ए-मोहम्मदची टॉप कमांडर आहे. तिला 'मॅडम सर्जन' हे कोड नेम देण्यात आले आहे. तिचे सहकारी आणि दहशतवादी तिला याच नावाने संबोधतात.
टीम D म्हणजे काय आणि त्याचा स्फोटाशी कसा संबंध आहे?
टीम D ही जैश-ए-मोहम्मदच्या उच्च कमांडरच्या संपर्कातील एक टीम आहे. शाहीनच्या चॅटबॉक्समध्ये टीम D चा उल्लेख आहे आणि तिचे डॉक्टर सहकारी या टीममध्ये सक्रिय आहेत.
दहशतवाद्यांनी संवादासाठी कोणते कोड शब्द वापरले?
दहशतवाद्यांनी शंकाही येणार नाही असे कोड शब्द वापरले: दहशतवाद्यासाठी 'स्पेशलिस्ट', हृदयरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ किंवा 'डॉक्टर'. हे शब्द चॅटबॉक्समध्ये आपसात संवादासाठी वापरले जात होते.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.