Delhi Blast Update: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी झालेल्या कार बॉम्बस्फोटात नऊ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. सामान्यांमध्ये दहशत पसरवणारी ही घटना एका व्यक्तीचं काम नाही तर एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचं षड्यंत्र आहे. तपास यंत्रणांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे त्याप्रमाणे धक्कादायक खुलासा होत आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्यातील संभाषण कळू नये यासाठी चॅटबॉक्समध्ये कोड शब्द वापरले होते. हे कोड इतके सोपे होते की, ते कोणताही संशय निर्माण होणार नाही. पण त्यामागे एक प्राणघातक कट आखला जात होता.
जर कोणी म्हटलं की, "दावत के लिए बिरयानी तैयार है',". तर आपल्याला कोणीतरी एखादा कार्यक्रम किंवा पार्टीसाठी आमंत्रण देत आहे असंच वाटेल. पण दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान, हा संदेश म्हणजे मृत्यूचा सापळा होता असं उघड झालं आहे. सुरक्षा यंत्रणांना एक डिजिटल चॅटबॉक्स सापडला आहे जिथे दहशतवाद्यांनी त्यांचा संपूर्ण प्लॅन कोड वर्डमध्ये रचला होता. "मेजवानी" म्हणजे स्फोट किंवा हल्ला, तर "बिर्याणी" म्हणजे स्फोटक पदार्थ.
सायबर सुरक्षेत आपण पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी ही युक्ती वापरली होती. तपास अहवालानुसार, ती शाहीनने पाठवली होती. एनआयएच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासणीतून हा खुलासा झाला.
तपासातून असं दिसून आलं आहे की लाल किल्ला स्फोट हा एका संघटित मॉड्यूलचे काम होते. जैश-ए-मोहम्मद सारख्या पाकिस्तानस्थित गटांशी संबंध असल्याचा संशय आहे. एनआयएने तपास आपल्या हाती घेतला आहे. सायबर सेल चॅटमधील उर्वरित सदस्यांचा माग काढला जात आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.