)
मंदिराबाहेर, रेल्वेस्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये आपण भिकारी नेहमीच बघतो.. मात्र आता युट्यूबरही एक डिजिटल भिकारी आलाय.. पाहुयात कसा आहे हा डिजिटल भिकारी..
मोबाईलसमोर उघडाबंब बसलेला हा माणूस कोण असा प्रश्न तुम्हाला पडला ना... तर हा आहे डिजिटल भिकारी. या डिजिटल भिका-याचं नाव आहे गौतम सूर्य. युट्यूब चॅनलवर त्याचे थोडेथोडके नाही तर तब्बल 5 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत आणि हे फॉलोअर्स त्याच्या अकाऊंटमध्ये भरभरुन दानही टाकतात. गौतमने त्याच्या चॅनेलवर 38 हजार व्हिडीओ अपलोड केलेत. त्याच्या या व्हिडीओला एकूण 26 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालेत. गौतम सूर्य दररोज 3-4 तास लाइव्ह येतो आणि स्क्रीनवर QR कोड लावून लोकांकडून पैसे मागतो. जेव्हा तो लाइव्ह येतो, तेव्हा एका वेळी 10 हजारांहून अधिक लोक त्याच्याशी जोडले जातात. लाइव्ह पाहताना लोक त्याला QR कोडद्वारे 1 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत पेमेंट करतात. अनेकजण त्याला 1 रुपया पाठवतात. जेव्हा कोणी त्याला पेमेंट करतो, तेव्हा गौतम त्या व्यक्तीचे नाव घेऊन थँक्यू म्हणतो.
अशा प्रकारे डिजिटल भिक मागून गौतम रोज किमान हजार रुपये कमावतो. त्याचा डिजिटल भिकारी बनण्याचा प्रवासही रंजक आहे. तरुण असूनही तो बेरोजगार होता. मध्यरात्री जेव्हा त्याचे वडील सायकलनं घरी यायचे तेव्हा त्यांची नजरानजर व्हायची. या वयात वडिलांना सायकल चालवताना पाहणं वेदनादायक होतं. त्यामुळे त्यानं भीक मागण्याचा हा अनोखा फंडा शोधून काढला.
गौतम सूर्य याच्या चॅनेलच्या बायोमध्ये लिहिलंय “एक दिवस मी माझे घर नक्की बांधेन, मग कोणीही मला इथून निघून जा असं म्हणणार नाही.'' यातून घरासाठी सुरु असलेली त्याची तगमग दिसून येते.. विशेष म्हणजे तो कोणालाही फॉलो करत नाही...फक्त त्याच्या दुस-या चॅनेललाच फॉलो करतो... असा हा डिजिटल भिकारी सध्या युट्यूबर चांगलाच धुमाकूळ घालतोय..