Diwali 2025 : दसरा सरला की जाणाऱ्या प्रत्येक दिवसासमवेत दिवाळी नेमकी किती जवळ आली आहे याचीच अनुभूती होते. बाजार सजू लागतात. या सणाच्या निमित्तानं घरात नवी खरेदी होते, दिवाळीची खऱ्या अर्थानं जंगी तयारी सुरू होते. या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे दिवाळीआधी होणारी घराची साफसफाई. घराता कानाकोपरा या सणापूर्वी स्वच्छ केला जातो. अडीअडचणीच्या वस्तू टाकाऊ ठरवून त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. याचदरम्यान एक अखेरची खात्री करून घेण्यासाठी म्हणून घरातली मंडळी रिकामे खोके, पेट्या यांची तपासणी करतात.
अनावधानानं आपण काही महत्त्वाचं फेकून तर देत नाही आहोत ना, हेच तपासणं त्यामागचा हेतू असतो. घर स्वच्छ करण्यामागे अशीची धारणा आहे, की असं केल्यानं धन, संपत्ती आणि भाग्य घेऊन येणारी लक्ष्मी यामुळं घरात वास करते. हे सगळं ठीक, पण याच साफसफाई मोहिमेदरम्यान यावेळी एका कुटुंबावर लक्ष्मी जरा आधीच प्रसन्न झाली. सोशल मीडियावर चर्चेत असणारी पोस्ट हेच सांगत आहे.
'रेडिट'वर '2025 ची सर्वात मोठी साफसफाई...' अशा मथळ्यानं एक पोस्ट करण्यात आली आहे. जिथं युजरनं आपल्या आईला घरात लपवून ठेवण्यात आलेली 2 लाख रुपयांची नोटांची गड्डी सापडल्याचं सांगितलं. या होत्या 2000 रुपयांच्या नोटा.
'दिवाळी सफाईनिमित्त माझ्या आईला 2000 रुपयांच्या गड्डीत असणारी 2 लाखांची रक्कम सापडली. हे एका DTH बॉक्समध्ये दडवण्यात आलं होतं. मला वाटतं हे तिथं माझ्या अस्सल भारतीय वडिलांनी नोटबंदीच्या दिवसांमध्ये ठेवलं असावं. आम्ही त्यांना अजून याची माहिती दिलीच नाहीये....', असं या युजरनं पोस्टमध्ये लिहिलं.
Biggest diwali Safai of 2025
byu/Rahul_Kumar82 inindiasocial
इथं या नेटकऱ्यानं ही पोस्ट करताच ती चर्चेचा विषय ठरली. अनेकांनीच त्याच्या ही बाब लक्षात आणून दिली की, 2000 च्या नोटा चलनबाह्य असल्या तरीही यातून त्यांना कमाई करता येऊ शकते. निर्धारित आरबीआय कार्यालयात जाऊन या नोटा बदलता येतील असं सांगितलं. काही नेटकऱ्यांनी या पोस्टवर मिश्किल प्रतिक्रिया देत, 'देवानं मलाही असे पैसे द्यावेत आणि मी ते कुठेतरी ठेऊन विसरावेत....'. एका युजरनं सावधगिरीची माहिती देत हे पैसे आरबीआयकडे नेण्याआधी आर्थिक सल्लागारांशी चर्चा करत आरबीआयपुढे काय कारण सादर करणार हे ठरवा असंही म्हटलं.
2000 रुपयांच्या नोटा अद्याप चलनबाह्य आहेत का?
होय, त्या अद्यापही कायदेशीर चलन आहेत. तुम्ही त्यांचा वापर करू शकता, पण दैनंदिन व्यवहारांसाठी त्या अवघड झाल्या आहेत.
या नोटा बँकेत बदलता येतील का?
नाही, सामान्य बँक शाखांमध्ये बदलण्याची सुविधा 7 ऑक्टोबर 2023 नंतर बंद झाली आहे. आता फक्त 19 नामांकित आरबीआय कार्यालयांमध्ये (इश्यू ऑफिसेस) जमा किंवा बदल करता येईल.
आरबीआय कार्यालय कुठे आहेत?
अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाल, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कनाट प्लेस (दिल्ली), कण्णूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पटणा, तिरुवनंतपुरम आणि थ्रिसूर.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.