Dog Temples In India: देव-देवतांची नाही तर भारतातील 'या' मंदिरांमध्ये केली जाते कुत्र्यांची पूजा

Worshiping Dog: हिंदू धर्मात गायी, साप इत्यादींची पूजा केली जाते पण आज आम्ही तुम्हाला अशा काही मंदिरांबद्दल सांगणार आहोत जिथे कुत्र्यांचीही पूजा केली जाते.    

तेजश्री गायकवाड | Updated: May 17, 2025, 06:28 PM IST
Dog Temples In India: देव-देवतांची नाही तर भारतातील 'या' मंदिरांमध्ये केली जाते कुत्र्यांची पूजा

भारताच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत, ज्याची स्वतःची स्टोरी आहे, श्रद्धा आहे. मंदिर म्हंटल की देवी-देवताच लक्षात येतात. पण हिंदू धर्मात  गाय, नाग, वानर असे काही प्राणी पूजनीय मानले गेले आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का की भारतात काही ठिकाणी कुत्त्यांचीही पूजा केली जाते. भारतात अशी मंदिरे कुठे स्थापित आहेत ते जाणून घेऊयात. त्या मंदिरात कुत्र्यांना देवतासमान मानले जाते.

कर्नाटक 

कर्नाटक येथील चिन्नपटणा गावात कुत्त्याचे मंदिर आहे. रामनगर जिल्ह्यातील या मंदिरात लोक मानतात की कुत्र्यांमध्ये खूप शक्ती असते. हे प्राणी संकट टाळण्याची क्षमता ठेवतात. त्या मंदिरात पूजा केल्याने गावावर संकट येत नाही, असे स्थानिकांचे मत आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये  कुकुरदेव मंदिर आहे. बालोद जिल्ह्यातील या मंदिरात एका वफादार कुत्त्याची समाधी आहे. येथे पूजा केल्याने कुकुर खोकला (Whooping Cough) आणि कुत्त्याच्या चाव्याचे भय दूर होते, अशी मान्यता आहे.

 केरळ 

केरळमधील कन्नूर येथील  पेरिसिनी मुथप्पन मंदिरातही कुत्र्यांची पूजा होते. या मंदिरात कुत्र्यांना देवाचा वाहन मानले जाते. येथे कुत्र्यांसाठी नामकरण विधीही केला जातो. पुजारी त्यांच्या कानात मंत्र बोलतात आणि प्रसाद देतात.

उत्तर प्रदेश 

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातील भैरव मंदिरातही कुत्र्याची पूजा केली जाते. तिथे  मंदिर प्रांगणात कुत्र्याची मूर्ती आहे आणि जवळच एक पवित्र तलाव आहे. कुत्र्याच्या चाव्याने त्रस्त झाल्यावर या तलावात स्नान केल्यास त्या जखमेचा  परिणाम कमी होतो, असे मानले जाते.

या सगळ्या मंदिरांमधून भारतातील विविधतेतून एक वेगळीच श्रद्धा आणि संस्कृती दिसून येते.