17 रुपये अन् स्वप्नांची बॅग घेऊन हिसारहून गाठली दिल्ली, डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रेरणादायी कहाणी!

Dr Subhash Chandra inspirational Story: जगप्रसिद्ध मीडिया सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 30, 2025, 05:57 PM IST
17 रुपये अन् स्वप्नांची बॅग घेऊन हिसारहून गाठली दिल्ली, डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रेरणादायी कहाणी!
डॉ. सुभाष चंद्रा

Dr Subhash Chandra inspirational Story:   55 वर्षांपूर्वी म्हणजेच साधारण 1978 च्या सुमारास हरयाणातील हिसार येथून एक तरुण दिल्लीला आला. त्यांच्या खिशात फक्त 17 रुपये होते, पण मनात मोठी स्वप्ने आणि त्यांना पूर्ण करण्याची प्रचंड जिद्द होती. तिच व्यक्ती आज जगप्रसिद्ध मीडिया सम्राट डॉ. सुभाष चंद्रा म्हणून ओळखले जातात.

Add Zee News as a Preferred Source

आजोबांचे तीन मौल्यवान संदेश

डॉ. सुभाष चंद्रा यांना त्यांच्या आजोबा जगन्नाथ गोयंका यांनी दिलेल्या तीन संदेशांनी आयुष्यभर साथ दिली आहे. कधीही घाबरू नको,  दिलेला शब्द कधीही मोडू नको आणि खरेपणाचा मार्ग कधी सोडू नको, ही तत्त्व ते आयुष्यभर पाळत आले आहेत.

शून्यातून विश्व निर्माण 

डॉ. सुभाष चंद्रा यांनी आपल्या करिअरची सुरुवात डाळींच्या व्यापाराने केली. हळुहळू त्यांनी कुटुंबाचे सर्व कर्ज फेडले. नंतर रशियाला (तत्कालीन USSR) तांदूळ निर्यात करून खूप पैसा कमावला. पण ते येथेच थांबले नाहीत. 1992 मध्ये त्यांनी भारतातील सर्वात पहिले खासगी टीव्ही चॅनेल Zee TV सुरू केले. त्याकाळी टीव्ही फारच कमी घरात होते पण त्यांनी भविष्य पाहिलं आणि आज Zee ची अनेक चॅनेल्स जगभरात कोट्यवधी घरात पोहोचतात.

समाजकार्य

आज त्यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्समध्ये आहे. Zee कुटुंबात 10000 पेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार दिला आहे. तरीही ते समाजासाठी खूप काही करतात. देशभरात 52 हजार एकल विद्यालये चालवतात. याद्वारे दुर्गम भागातील मुलेही शिकत आहेत.

डॉ. चंद्रा यांचा संदेश

डॉ. चंद्रा म्हणतात, “यश फक्त त्यांनाच मिळते जे बदल स्वीकारतात – सर्वात हुशार किंवा बुद्धिमान असणे गरजेचे नाही.” आजही ते आपल्या आयुष्याच्या “तिसऱ्या टप्प्यात” आहेत असं म्हणतात. पण समाजात सकारात्मक बदल घडवण्याची त्यांची ऊर्जा आणि नव्या गोष्टी शिकण्याची तयारी पाहता त्यांचा प्रवास अजून खूप पुढे जाणार आहे.

FAQ

प्रश्न : डॉ. सुभाष चंद्र दिल्लीला कधी आणि कशा अवस्थेत आले?

उत्तर : सुमारे ४६ वर्षांपूर्वी (१९७८ च्या आसपास) ते हरयाणातील हिसार येथून दिल्लीला आले. त्यांच्या खिशात फक्त १७ रुपये होते, पण मनात मोठी स्वप्ने आणि जिद्द होती.

प्रश्न : त्यांनी आयुष्यात सर्वात मोठे यश कशामुळे मिळवले?

उत्तर : त्यांच्या आजोबांनी दिलेले तीन नियम (घाबरू नको, वचन पाळ, खरे राहा) आणि बदल स्वीकारण्याची तयारी यामुळे. १९९२ मध्ये त्यांनी भारतातील पहिले खाजगी टीव्ही चॅनेल Zee TV सुरू केले, जे आज देशातील सर्वात मोठे चॅनेल नेटवर्क आहे.

प्रश्न : आज ते फक्त व्यवसाय करतात की समाजकार्यही करतात?

उत्तर : दोन्ही करतात! त्यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्समध्ये आहे आणि १०,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे. तरीही ते देशभरात ५२,००० एकल विद्यालये चालवतात, जेणेकरून गावागावातील गरीब मुलेही शिक्षण घेऊ शकतील.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More