नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना झटका दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राजीव कुमार यांना नोटीस बजावण्यात आलीय. नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी काँग्रेसच्या न्याय योजनेविषयी बोलताना प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भातलं त्यांच्या वक्तव्याने भाजपला फायदा पोहोचला असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचं मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे. याप्रकरणी आयोगानं राजीव कुमार यांना दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस बजावली आहे. 'मै भी चौकीदार हूँ' या प्रचारगीतात सैनिकांच्या छबीचा वापर करण्यात आल्याने ही नोटीस बजावली आहे. सैनिकांची दृष्ये वगळण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत, भाजपने सैनिकांच्या व्हिडिओ क्लीपसह हे गाणे प्रकाशित केले. त्यामुळे भाजपवर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगितले आहे. भाजपच्या या 'मै भी चौकीदार हूँ' गाण्यातील भारतीय सैनिकांच्या व्हिडिओ क्लीप्स वगळाव्यात, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत, भाजपने सैनिकांच्या व्हिडिओ क्लीपसह हे गाणे प्रकाशित केले. त्यामुळे भाजपवर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तसेच लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान आचार संहिता उल्लंघन प्रकरणी निवडणूक आयोगाने राजीव कुमार यांना नोटीस धाडली. राजीव कुमार यांनी काँग्रेसद्वारे न्याय योजनेंतर्गंत गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये वार्षिक देण्याच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आर्थिक परिस्थिती पाहता हे शक्य नसल्याचं राजीव कुमार यांनी म्हटले होते. काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकते, असे राजीव कुमार यांनी सोमवारी म्हटले होते.