गाझियाबाद : सोशल मीडियावर सध्या वीज चोरीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य झाला आहे. खरेतर हे एक गंभीर प्रकरण आहे. परंतु या माणसाची अवस्था पाहून तुम्हाला यावर हसू देखील येईल. कारण हे गंभीर प्रकरण हाताळण्यासाठी त्याने जो मार्ग अवलंबला आणि तो त्यात कसा फसला, हे पाहून तुम्हाला त्या माणसाची किव येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यूझर्स सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओला जोरदार शेअर करत आहेत. तर मग आधी जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे ते?


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादची आहे. असे सांगितले जात आहे की, अनेकदा वीज चोरीला जात असल्याची तक्रार नोंदवली गेल्यामुळे वीज विभागाची टीम छापा टाकण्यासाठी आली होती.


ज्या घरातील लोकांनी चोरुन वीज घेतली होती, त्या घरातील लोकांना याची माहिती मिळतच, एका सदस्याने हातात पक्कड घेतली आणि घराच्या छतावर गेला.  खालून कोणाही त्याला पाहू नये म्हणून तो छतावर रेंगाळत वायर कापण्यासाठी आला. परंतु त्याचा काही एक फायदा झाला नाही. कारण त्याला वीज अधिकाऱ्याने हे करत असताना रंगे हातो पकडलेच.


ही संपूर्ण बाब वीज आधिकाऱ्याने एका कॅमेर्‍यामध्ये कैद केली आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



खरेतर एका मीडिया अहवालात असे म्हटले आहे की, मुरादनगरमधील वीज विभागात बर्‍याच दिवसांपासून वीज चोरीच्या तक्रारी येत होत्या. हे नक्की कोण करत आहे? अशा लोकांना पुराव्यानिशी पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि त्यांपैकी काही लोकं घरांच्या छतावर येऊन उभे राहिले आणि पुराव्यांसाठी मोबाईलमध्ये हे सगळं कैद करत होते.


लोकं हा व्हिडीओपाहून एन्जॉय करत आहेत आणि याला सोशल मीडियावर शेअर देखील करत आहेत. काही लोकं या घटनेवर टीका करत आहेत, तर काहीजण म्हणत आहेत की, हे अतिशय मजेदार दृष्य आहे.