EPFO देतंय 21 हजारपर्यंतचे चे रोख बक्षीस, तुमच्याकडे 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ; करा फक्त 'हे' छोटसं काम!

EPFO Competition:  ईपीएफओने एक अनोखी ऑनलाइन स्पर्धा सुरू केलीय.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 5, 2025, 10:59 AM IST
EPFO देतंय 21 हजारपर्यंतचे चे रोख बक्षीस, तुमच्याकडे 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ; करा फक्त 'हे' छोटसं काम!
ईपीएफओ

EPFO Competition: शब्दसृष्टीत रमणाऱ्या आणि नवीन कल्पना रंगवणाऱ्या उत्साहींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने एक अनोखी ऑनलाइन स्पर्धा सुरू केलीय. त्यात तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीला आकार देऊन मोठे बक्षीस मिळवता येईल. या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांच्या सृजनात्मक दृष्टिकोनाला प्रोत्साहन मिळणार आहे. काय आहे ही स्पर्धा? किती मिळेल तुम्हाला बक्षिस? सविस्तर जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

स्पर्धेचं स्वरूप कसं असेल? 

ईपीएफओ ही स्पर्धा लावत आहे. ज्यातून क्रिएटीव्ह लोकांना बक्षिसं मिळवण्याची संधी चालून आली आहे. या स्पर्धेसाठी तुम्हाला टॅगलाइन पाठवायची आहे. टॅगलाईन एक संक्षिप्त, आकर्षक ओळ असावी जी ईपीएफओच्या सेवांचा सारांश सांगेल. तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाइटवरून सहज सहभागी होता येईल. ज्यात क्यूआर कोडद्वारे लिंकदेखील उपलब्ध आहे.

किती रुपयांचं बक्षिस? 

तीन उत्कृष्ट टॅगलाइन्सला विशेष मान्यता मिळेल. प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये, द्वितीयसाठी 11 हजार रुपये आणि तृतीयसाठी 5100 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना ईपीएफओच्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागाची होण्याची संधी मिळेल. ज्यात दिल्ली प्रवास, निवास आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कसे व्हाल सहभागी? 

फक्त एका छोट्या ओळीची टॅगलाइन तयार करा जी ईपीएफओच्या मूल्यांना प्रतिबिंबित करणारी असेल. ती ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करा. स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून अंतिम निर्णय ईपीएफओची समिती घेणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करून तपशील पाहा आणि लगेच कामाला लागा.

शेवटची मुदत  

डिजिटल युगात टॅगलाइन ही संस्थेची ओळख असते. तुमची ओळ लाखो सदस्यांपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे ईपीएफओच्या सेवांना नवीन आयाम मिळेल. ही केवळ बक्षीस नाही, तर तुमच्या प्रतिभेची ओळख आहे. 10 ऑक्टोबर 2025 ही शेवटची मुदत आहे. उशीर करू नका; तुमच्या शब्दसौंदर्याने हे सोनेरी क्षण जिंका. ईपीएफओसारख्या मोठ्या संस्थेच्या ध्येयात योगदान देण्याची ही दुर्मीळ संधी आहे.

FAQs

ईपीएफओच्या टॅगलाइन स्पर्धेत कोण सहभागी होऊ शकते आणि ती कधीपर्यंत चालेल?

ही स्पर्धा सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे, ज्यांना सर्जनशीलतेने ईपीएफओच्या ध्येयाला साजेशी टॅगलाइन तयार करायची आहे. स्पर्धा १ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाली असून, ती १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल. तुम्ही तुमची टॅगलाइन मायगव.इन किंवा ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन सादर करू शकता.

स्पर्धेत कोणती बक्षिसे मिळतील?

स्पर्धेत तीन विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील: प्रथम बक्षीस २१,००० रुपये, द्वितीय बक्षीस ११,००० रुपये आणि तृतीय बक्षीस ५,१०० रुपये. याशिवाय, विजेत्यांना दिल्ली येथे होणाऱ्या ईपीएफओच्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे त्यांना प्रमाणपत्र आणि विशेष मान्यता दिली जाईल.

टॅगलाइन कशी सादर करायची आणि त्यासाठी काय करावे लागेल?

तुम्हाला ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा आणि कामगार सक्षमीकरणाच्या ध्येयाला साजेशी एक छोटी, आकर्षक आणि प्रभावी टॅगलाइन तयार करायची आहे. ही टॅगलाइन ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून मिळणाऱ्या लिंकद्वारे ऑनलाइन सबमिट करावी लागेल. तपशील आणि नियम वेबसाइटवर उपलब्ध आहेत, त्यामुळे सबमिशनपूर्वी सर्व माहिती तपासा.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More