Pahalgam Attack News: साजिद 'लंगडा'च पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! 1597 पानांच्या चार्जशीटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द हादरवणारा

Pahalgam Attack News:  NIA कडून पहलगाम हल्ल्य़ासंदर्भातील सर्वात गोपनीय माहिती देशासमोर. पाकिस्तान कनेक्शनपासून काही नावांच्या थेट आणि तितक्याच स्पष्ट उल्लेखापर्यंत... पाहा महत्त्वाची बातमी.   

सायली पाटील | Updated: Dec 16, 2025, 08:37 AM IST
Pahalgam Attack News:  साजिद 'लंगडा'च पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! 1597 पानांच्या चार्जशीटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द हादरवणारा
Explainer pahalgam terror attack NIA Files chargesheet inside details terrorist attack pakistan isi role

Pahalgam Attack News:  एप्रिल 2025 मध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भयावह हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू ओढावला. ज्यामध्ये पर्यटकांसह स्थानिक नागरिकाचाही समावेश होता. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या घटनेबाबत आता एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए (NIA) नं नुकतेच काही गोपनीय आणि तितकेच संवेदनशील संदर्भ देशासमोर आणले आहेत. तब्बल 1597 पानांची चार्जशीट दाखल करत एनआयएनं या हल्ल्याचा सूत्रधार कोण होता हेसुद्धा सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोणी रचलेला संरक्षण यंत्रणांनाही हादरवणाऱ्या हल्ल्य़ाचा कट?

एनआयएनं दाखल केलेल्या चार्जशीटनुसार पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर सैफुल्लाह साजिद जट्ट उर्फ 'लंगडा' हाच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. एनआयएनं साजिद लंगडाला या हल्लाप्रकरणी मुख्य आरोपी ठरवलं आहे. काही गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार साजिद जट्ट एक Let या दहशतवादी संघटनेतील टॉप कमांडर असून, कथित स्वरुपात पाकिस्तानच्या इस्लामाबाद इथून त्याची कटकारस्थानं रचतो. पाकिस्तानच्या इंटर सर्विसेज इंटेलिजेन्स (ISI)सह त्याचे जवळचे संबंध असून, अनेक काटकारस्थानांमध्ये त्याला यंत्रणेची मदतही मिळाल्याचं म्हटलं जात आहे. किंबहुना पहलगाममध्ये झालेला हल्ला हा आयएसआस आणि लष्कर...नं मिळूनच केला होता. 

पाकची 'नापाक' गुप्तचर यंत्रणा...

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडून या हल्ल्यासाठी मदत करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा झाला असून, ISI नंच जट्टला असेही निर्देश दिले होते की, या हल्ल्यासाठी फक्त पाकिस्तानच्याच दहशतवाद्यांचा वापर केला जावा, जेणेकरून गोपनीयता राखता येईल. इतकंच नव्हे, तर खर्च आणि तत्सम गणितांमध्ये स्थानिक कट्टरतावाद्यांची कमीत कमी भागिदारी राहील यावर लक्ष देण्याच्या सूचनाही आयएसएआयनं केल्या होत्या. 

कोण आहे हा साजिद जट्ट?

साजिद जट्ट याची खरी ओळख हबीबुल्लाह मलिक उर्फ सैफुल्लाह साजिद जट्ट अशी असून, पाकिस्तानस्थित दहशकतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा तो म्होरक्या असून एक मोस्ट वाँटेड दहशतवादी असल्याचं सांगण्यात येतं. जट्ट लष्कर..च्या  प्रॉक्सी ग्रुप, द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) च्या कटांमध्ये सहभागी असतो. तो मुळचा पाकिस्तानातील पंजाब प्रांतात येणआऱ्या कसूर जिल्ह्यातील रहिवासी असून, 2000 या वर्षाच्या सुरुवातीला तो काश्मीरमध्येच होता. मात्र 2005 मध्ये तो पाकिस्तानात केला, जिथं 'लंगडा' या नावानं तो ओळखला जाऊ लागला. दहशतवादी संघटनांमध्ये नव्या दहशतवाद्यांची भरती, संघटनांसाठीचं आर्थिक पाठबळ आणि त्याची व्यवस्था, दहशतवाद्यांच्या भारतातील घुसखोरीसाठीची व्यवस्थेसह काश्मीरमध्ये टीआरएफ डिजिटल आऊटरिच अशा कटांमध्ये जट्टचा सहभाग असल्याचं सांगण्यात येतं. 

अनेक संदर्भ आणि नोंदींनुसार संरक्षण यंत्रणांना असणाऱ्या संशयानुसार जम्मू काश्मीरमध्ये हल्लीच झालेल्या काही हाय प्रोफाईल हल्ल्यांचा खरा सूत्रधार जट्ट असल्याचच सांगण्यात येतं. यामध्येच 2025 चा पहलगाम हल्लासुद्धा समाविष्ट असून, भारतीय सैन्यदलातील जवानांवर झालेल्या हल्ला, 2013 मधील हैदरपोरामधील हल्ला, 2002 मध्ये बडगाम इथं SHO ची हत्या अशा कटकारस्थानांमध्येही त्याचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. एनआयएच्या Most Wanted दहशतवाद्यांच्या यादीत जट्टचा समावेश असून, त्याची माहिती देण्याऱ्यास 10 लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. 

दरम्यान पहलगाम हल्ल्याप्रकरणात फक्त जट्टटच नव्हे तर, पाकमधील लष्कर ए तोयबा आणि टीआरएफ यांच्यासह आणखी 6 दहशतवाद्यांना आरोपी ठरवण्यात आलं आहे. एका पत्रकामध्ये एनआयएनं जारी केलेल्या माहितीनुसार उपलब्ध पुराव्यांनुसार पहलगाम हल्ल्याचा कट रचून तो अमलात आणत हल्ला घडवून आणण्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

1597 पानांच्या चार्जशीटमध्ये आणखी काय?

साजिद लंगडा याचा मुख्य आरोपी असा उल्लेख असणाऱ्या एनआयएच्या चार्जशीटमध्ये जुलै 2025 मधील श्रीनगरच्या दाचीगाम इथं करण्यात आलेल्या 'ऑपरेशन महादेव' या भारतीय लष्करी मोहिमेचा उल्लेख असून, त्यात ठार करण्यात आलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावांचाही उल्लेख आहे. ज्यामध्ये फैसल जट्ट @ सुलेमान शाह, हबीब ताहिर @ जिब्रान आणि हमजा अफगानी अशी नावं समोर येत असून, पहलगाम हल्ल्यानंतर झालेली ही एक मोठी लष्करी कारवाई होती. 

याव्यतिरिक्त परवेज अहमद आणि बशीर अहमद जोथर नामक व्यक्तींना दहशतवाद्यांना आसरा देण्याच्या आरोपाखाली एनआयएनं 22 जून 2025 ला अटक केल्यानंतर आता त्यांच्याविरोधातही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान या दोघांनी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांच्या ओळखीचा खुलासा करत ते पाकिस्तानी नागरिक असल्याचंही स्पष्ट केलं होतं. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More