)
Bilawal Bhutto Dance Video: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेला उत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तानवर कठोर भूमिका घेत काही निर्णायक पावले उचलली. याअंतर्गत भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आणि सिंधू नदीतून पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठाही थांबवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत गरळ ओकली. यानंतर बिलावल भारतीयांच्या रागाचे कारण बनलाय. दरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात ट्रेण्ड होतोय. या व्हिडीओत थिरकणारी व्यक्ती बिलावल असल्याचे म्हटलं जातंय. काय आहे यामागचे सत्य जाणून घेऊया.
Bollydawood should make a movie on him & call it :
— Sameer (@BesuraTaansane) January 21, 2023
Billu Baaylya#Bilawal_Bhutto_Zardari pic.twitter.com/DVqKWZkzGn
पाकिस्तानी राजकारणी बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू करारावरील भारताच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी एक वादग्रस्त विधान केले. 'सिंधू नदी इस्लामाबादची आहे आणि ती नेहमीच इस्लामाबादकडेच राहील, असे म्हणत त्यांनी धमकीही दिली.जर सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानात येण्यापासून रोखले गेले तर नदीच्या पाण्याऐवजी भारतीयांचे रक्त वाहेल, असे ते म्हणाले. या विधानानंतर बिलावल भुट्टो झरदारींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते नाचताना दिसतायत.
नचनिया के साथ नाचते-नाचते बिलावल भुट्टो के अंदर की स्त्री जाग गई
— Kikki Singh (@singh_kikki) April 26, 2025
लौंडिया नाच नाचने वाले अब बताएंगे की सिंधु नदी का पानी उनका था है और रहेगा pic.twitter.com/T7nCu8Vy3f
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारत पाकिस्तानला दोष देऊन आपली कमजोरी लपवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून लोक गोंधळून जातील, असे बिलावल भुट्टो एका मेळाव्यात म्हणाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आणि म्हटले की सिंधू नदीचे पाणी थांबवणे योग्य नाही. सिंधू पाणी कराराअंतर्गत भारताने सिंधू नदी पाकिस्तानची आहे हे मान्य केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये बिलावल भुट्टो झरदारी 'आज की रात' या गाण्यावर नाचताना दिसतायत. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक त्यांच्यावर टीका करतायत. तर त्यांचे समर्थक या डान्स आणि गाण्याचा आनंद घेतायत.
हा व्हिडिओ पाकिस्तानी अभिनेत्री इनाया खानच्या बहिणीच्या लग्नावेळचा होता. जो पहिल्यांदा 13 जानेवारी 2023 रोजी शेअर करण्यात आला होता. इनायाच्या प्रोफाइलवर आणि बेगच्या प्रोफाइलवर या समारंभाचे इतर अनेक व्हिडिओ आहेत. यासोबतच समारंभांचे इतर व्हिडिओ इनाय खानच्या यूट्यूब चॅनेलवर देखील उपलब्ध होते. आणि 'बिलावल भुट्टो'च्या डान्स मूव्हजवर नेटिझन्स त्यांना ट्रोल करतायत. पण ही नाचणारी व्यक्ती पाकिस्तानी मंत्री नसून मेहरोज बेग नावाचा एक विद्यार्थी आणि मॉडेल आहे. या व्हिडीओतील व्यक्ती बिलावल भुट्टो नाहीय, हे स्पष्ट झालंय.
बिलावल भुट्टो जरदारी यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली जाण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली. पाक नेते भुट्टो यांनी भारतानं सिंधूवर हल्ला केल्याचं म्हणत देशाला हल्लेखोर म्हटलं. भारताची लोकसंख्या आमच्याहून जास्त असेल मात्र पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानातही लढा देऊ, असं सांगत आमचा आवाजच भारताला सडेतोड उत्तर देईल याचाच पुनरुच्चार त्यांनी केला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीसुद्धा सिंधू जल कारारासंदर्भातील तणावपूर्ण वातावरणात आपल्या जळजळीत वक्तव्यानं आणखी भर टाकली. 'पाकिस्तानला पुरवलं जाणारं पाणी कमी केलं किंवा वळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी याचं उत्तर पूर्ण ताकदीनं दिलं जाईल, कोणीही इथं काहीही चूक करुच नये' असं म्हणत शांतता आमची प्राथमिकता असली तरीही अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीच तडजोड करणार नसल्याची भूमिका मांडत त्यांनीसुद्धा भारताविरोधात सूर आळवला.