Sunita Williams: नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दावा करण्यात येत आहे की, सुनीता या अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांच्यासोबत भगवद्गगीता आणि उपनिषेदसोबत घेऊन गेल्या होत्या. तसंच, 9 महिन्यानंतर त्या अंतराळातून त्यामुळंच सुखरुप परत येऊ शकल्या, असंही व्हिडिओत म्हटलं आहे. या व्हिडिओमागचं सत्य काय हे आज आपण जाणून घेऊया.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पत्रकार परिषदेतील असल्याचे दिसत आहे. सुनीता विलियम्स यात म्हणताना दिसत आहे की, भगवद्गीता आणि श्री गणेशाची मूर्ती नेहमी सोबत अंतराळात घेऊन जाते. पुढे त्या असं म्हणताना दिसत आहेत की, मी भारतीय असल्याचा मला खरोखरच आदर आणि आनंद आहे. त्याचाच एक भाग असलेला काही भाग मी माझ्यासोबत अंतराळात घेऊन जाते. माझ्या घरातही श्रीगणेशाची मूर्ती आहे. श्रीगणेश नेहमीच मी जिथे जाते तिथे माझ्यासोबत असतात. म्हणूनच मला त्यांना अंतराळातदेखील न्यावे लागते. त्याचबरोबर भारतीय जेवणे मी अंतराळात नेहमी समोसे घेऊन जाते, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
भगवद्गीतासोबतच मी उपनिषेददेखील अंतराळात घेऊन गेली होती. अंतराळात राहण्यासाठी आणि अशा प्रकारच्या गोष्टींवर चिंतन करण्यासाठी आणि वाचण्यासाठी योग्य आहे, असं त्या व्हिडिओत म्हणत आहेत.
सुनीता विलियम्स यांचा हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. त्यात युजरने म्हटलं आहे की, गणेश जी आणि भगवद्गीतानेहमीच माझ्यासोबत अंतराळात असतात. या दोन गोष्टी मला नेहमीच सपोर्ट करतात आणि मला मानसिक तणावापासून लांब ठेवतात. सुनीला विलियम्स यांची अमेरिकेत पत्रकार परिषद. सुनीला विलियम्स यांनी 9 महिन्यांनंतर अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतल्या याचे श्रेय भगवद्गीता आणि उपनिषेदेला दिले आहे, असा दावा करण्यात आला आहे. तसंच, आणखी एका ट्विटर युजरने हा दावा केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ जरी खरा असला तरी तो अर्धसत्य आहे. त्या व्हिडिओसोबत करण्यात आलेला दावा मात्र खोटा आहे. सुनीता विलियम्स यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ 2 एप्रिल 2013 रोजीचा आहे. या व्हिडिओचे टायटल आहे की, ''I had samosas in space with me, says astronaut Sunita Williams." सुनीता विल्यम्स यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्रात त्या संबोधित करत होत्या. अलीकडे व्हायरल झालेला हा भाग मूळ YouTube व्हिडिओच्या ०:३९ मिनिटांनी सुरू होतो.
व्हिडिओत करण्यात आलेला दावा हा खोटा असल्याचे समोर आले आहे. सुनीता यांचा व्हिडिओ 2013 चा असून या व्हिडिओत त्या त्यांच्या आधीच्या अंतराळ मोहिमांबद्दल बोलत होत्या.