ATM Card Tips: सोशल मीडियाच्या या युगात कोणताही मेसेज क्षणार्धात व्हायरल होतो. असाच एक अनोखा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही एटीएममध्ये व्यवहार करण्यापूर्वी दोनदा Cancel बटण दाबले तर तुमचा एटीएम पिन चोरीला जाणार नाही. महत्त्वाचं म्हणजे हा मेसेज आरबीआयचा हवाला देत शेअर केला जात आहे. हा मेसेज किती खरा आहे आणि त्याबाबत Fact Check RBI ने स्वतः केला आहे.
एटीएमध्ये गेल्यानंतर, 'Cancel' बटण दाबल्यानंतरच कोणतीही कृती करावी असा मेसेज होता. पण सत्य असं आहे की, तुम्ही तुमचे कार्ड पैसे काढण्यासाठी आतमध्ये घातले असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला व्यवहार पुढे करायचा नसेल, तर 'Cancel' बटण दाबल्याने प्रक्रिया थांबते. परंतु तुम्ही Cancel बटण दाबून कोणतीही ATM PIN चोरी रोखू शकत नाही.
पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा संदेश पूर्णपणे खोटा आहे. एटीएम मशीनचे कॅन्सल बटण दाबण्याचा तुमचे कार्ड सुरक्षित ठेवण्याशी काहीही संबंध नाही. आरबीआयने असे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
A post falsely attributed to @RBI claims that pressing 'cancel' twice on an ATM before a transaction can prevent PIN theft#PIBFactCheck
❌This statement is FAKE & has NOT been issued by RBI
✔️Keep transactions secure
✅Conduct fund transfer in private
✅Conduct fund… pic.twitter.com/hTT64E5bVa
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 6, 2025
एटीएममधून व्यवहार झाल्यानंतर लगेच कार्ड काढा.
प्रथम एटीएम मशीनमध्ये स्किमर बसवले आहे का ते तपासा.
तुमचा पिन एंटर करताना कीपॅड तुमच्या हाताने झाकून ठेवा.
एसएमएस आणि बँक ऍप सूचना नेहमी चालू ठेवा.
अज्ञात ठिकाणी असलेल्या एटीएम टाळा.
व्यवहार पूर्ण न करता एटीएममधून बाहेर पडण्यापूर्वी रद्द करा दाबा, परंतु तुम्ही असे केले म्हणून कार्ड सुरक्षित राहील असे गृहीत धरणे चुकीचे आहे.