...म्हणून बापानं 19 वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं

Father Shraddha ritual for daughter : नागराळ गावातून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. 19 वर्षीय जिवंत मुलीचं वडिलांनी श्राद्ध घातलं आहे. कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल. 

नेहा चौधरी | Updated: Oct 12, 2025, 11:54 PM IST
...म्हणून बापानं 19 वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं

Father Shraddha ritual for daughter :  कर्नाटकच्या बेळगावात जन्मदात्या बापाने आपल्या जिवंत मुलींचं श्राद्ध घातल्याची घटना घडलीय. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून बापानेही कृत्य केलंय. सोबतच बापाने संपूर्ण गावासह पै पाहुण्यानाही श्राद्ध जेवणासाठी बोलावलं होतं. जिवंत मुलीच्या श्राद्धाची घटना पाहून गावही आचंबित झालंय.  

Add Zee News as a Preferred Source

बापाने जिवंतपणीच मुलीचं श्राद्ध घातल्याची घटना कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. आपली लाडकी लेक प्रियकरासोबत पळून गेल्याचं जिव्हारी लागल्याने संतापलेल्या बापाने हे पिंडदान केलंय. एवढ्यावरच न थांबता एक तिथी काढून त्याने संपूर्ण गावासह पै-पाहुण्यांसाठी जेवणही ठेवलं होतं. मुलीचे वडील शिवगौडा पाटील यांनी गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीच्या फोटोला फुलं वाहून पिंडदान विधी केला. तसेच मृत व्यक्तीला अर्पण करतात तशीच श्रद्धांजली अर्पण केली. सोबतच या विधीत त्यांनी मुलीसोबतचे कुटुंबाचे संपूर्ण नातेसंबधही तुटल्याचं जाहीर करून टाकलंय. 

रायबाग तालुक्यातील नागराळ गावातील 19 वर्षीय तरुणी सुश्मिता हिचं गावातील विठ्ठल बस्तवाडे नावाच्या 29 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. विठ्ठल बस्तवाडे हा तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण सुश्मिताच्या कुटुंबीयांचा अशा प्रेमसंबंधांना विरोध असल्याने दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र लाडक्या लेकीचं कृत्याने घराण्याच्या संस्काराला धक्का बसला या विचाराने वडील अत्यंत दुःखी झाले. तसेच आपल्यासाठी आता मुलगी जणू 'मेली' आहे, असे समजून त्यांनी मुलीच्या जिवंतपणीचं तिचं श्राद्ध घातलं आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा निषेध केला असून शिवगौड पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. 

वडिलांकडूनच मुलीचे जिवंतपणे श्राद्ध ही घटना समाजातील मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. स्थानिक प्रशासनाला या प्रकारावर संवेदनशील आणि परिणामकारक उपाययोजना करावी लागणार आहे. तसेच सर्वच पालकांनी मुलाच्या व्यक्ति स्वातंत्र्यांचा आदर करायला हवा. 

FAQ

प्रश्न १: ही घटना कुठे आणि कशाबाबत आहे?
उत्तर: ही घटना कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली. जन्मदात्या बापाने आपल्या जिवंत १९ वर्षीय मुलीचे श्राद्ध केले. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून हे कृत्य केले गेले.

प्रश्न २: मुलीचे नाव आणि तिचा प्रियकर कोण?
उत्तर: मुलीचे नाव सुश्मिता आहे. तिचा प्रियकर विठ्ठल बस्तवाडे (वय २९ वर्षे) आहे, जो तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि लग्न करण्याची इच्छा होती.

प्रश्न ३: बापाने श्राद्ध कसे केले?
उत्तर: बाप शिवगौडा पाटील यांनी गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीच्या फोटोला फुले वाहून पिंडदान विधी केला. मृत व्यक्तीला अर्पण करतात तशी श्रद्धांजली अर्पण केली. एक तिथी काढून संपूर्ण गाव आणि पै-पाहुण्यांसाठी जेवण ठेवले.

प्रश्न ४: बापाने आणखी काय जाहीर केले?
उत्तर: श्राद्ध विधीत बापाने मुलीसोबतचे कुटुंबाचे संपूर्ण नाते-संबंध तुटल्याचे जाहीर केले. लाडकी लेक पळून गेल्याने घराण्याच्या संस्कारांना धक्का बसला, म्हणून मुलगी "मेली" समजून हे पिंडदान केले.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More