FCI Cashier: एका कर्मचाऱ्याकडे तब्बल 19 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले आहेत. त्यावरुन त्याविरोधात सीबीआयने तक्रार नोंदवली आहे.

FCI Cashier: सीबीआयने नागालँड येथील भारतीय अन्न महामंडळाच्या एका कॅशियरने तब्बल 19 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मात्र या कर्मचाऱ्याची गेल्या सहा महिन्यातील एकूण वेतन हे 40 लाख रुपयेच आहे. मग इतकी मोठी रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवले कसे, असा प्रश्न उपस्थित होत होता. साबीआयने या कर्मचाऱ्याविरोधात संपत्तीच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने बिटोका शोहेवर एप्रिल 2019 ते जून 2025 दरम्यान 18.99 कोटींची संपत्ती ही उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा ठपका ठेवत तक्रार दाखल केली आहे.ही रक्कम त्याच्या उत्पन्नेच्या तुलनेत 1,797.73 टक्के अधिक आहे. एफसीआयच्या दीमापुर मंडळ कार्यालयात सहाय्यक ग्रेड-1 आणि कॅशिअर पदावर नियुक्त आहे. सहा वर्षांच्या काळात त्याने 39.91 लाख रुपये इतका पगार मिळाला होता.
मुळ वेतनापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याच्या आरोपानंतर शोहे यांना निलंबित करण्यात आले. एफआयआरमध्ये नोंद केल्यानुसार, शोहे यांचे 2019 मध्ये लग्न झाले आणि या काळात त्यांच्या पत्नीचे एकूण उत्पन्न 26.8 लाख रुपये होते. एफआयआरनुसार, शोहे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 64.9 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते, त्यापैकी त्यांनी 21.79 लाख रुपये परत केले होते. तसंच, त्याच्या निवासस्थानासाठी बांधकाम साहित्यावर सुमारे 23.5 लाख रुपये खर्च केले आणि सुमारे 93,000 रुपयांच्या प्रीमियमसह विमा पॉलिसी देखील खरेदी केली.
सीबीआयने केलेल्या तपासानंतर, शोहे यांनी स्टोक मार्केटमध्ये 19 कोटींची गुंतवणुक केली होती. 1 एप्रिल 2019 आणि 14 मे 2025 दरम्यान ही गुंतवणुक करण्यात आली होती. त्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा बारकाईने आढावा घेतल्यानंतर, एजन्सीने असा निष्कर्ष काढला की तिने त्याच्या कायदेशीर कमाईपेक्षा जास्त मालमत्ता मिळवली होती, ज्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप लावण्यात आले.