सणासुदीच्या दिवसांत या मार्गांनी वाचवा पैसे; खर्च नियंत्रणात ठेवण्याची Ninja टेक्निक

खरेदी करताना अशी वापरा शक्कल 

Updated: Oct 16, 2021, 03:07 PM IST
सणासुदीच्या दिवसांत या मार्गांनी वाचवा पैसे; खर्च नियंत्रणात ठेवण्याची Ninja टेक्निक  title=

मुंबई : दसऱ्यानंतर दिवाळी आणि ख्रिस्मस या सणांची लगबग असते. कोरोनामुळे गेली दोन वर्ष सणांचा आनंद फार अनुभवता आला नाही. यंदा सगळ्यांचाच उत्साह दाणगा आहे. सणांना मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. या दरम्यान ऑफलाइन मार्केटमध्ये देखील बंपर सूट असते. सणांच्या दिवसात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आकर्षणे देखील दाखवली जातात. 

या आकर्षित ऑफर्सची भुरळ पडल्यावर अनेकजण आपलं बजेट विसरून खरेदी करतात. अनेकदा ऑफर्सच्या नादात गरज नसलेल्या गोष्टी देखील करतात. यालाच 'फेस्टिव फीवर' म्हटलं जातं. ज्यामध्ये आपण बजेटच्या बाहेर जाऊन खरेदी करतो. याचमुळे आपलं बजेट कोलमडत. 

एक बजेट तयार करा आणि त्यावर टिकून राहा 

सणासुदीच्या काळात अनेक शॉपिंग ऑफर असतात. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्याची एकापेक्षा जास्त संधी आहे. आता ऑफरच्या गोंधळात, आपण प्रथम खरेदीसाठी बजेट सेट केले पाहिजे. सणासुदीच्या खरेदीचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे आर्थिक आरोग्य खराब करता. तर स्मार्ट बजेट म्हणजे योग्य बजेट बनवणे आणि त्यावर स्थिर राहणे. उत्सवाच्या खरेदीसाठी तुम्हाला त्या निश्चित बजेटच्या बाहेर काहीही खर्च करण्याची गरज नाही. भेटवस्तू, प्रवास, सजावटी इत्यादी विविध श्रेणींसाठी तुम्ही खरेदीची रक्कम स्वतंत्रपणे ठरवा.

स्मार्ट पद्धतीने खरेदी करा 

जर तुम्ही योजना आखून खरेदी कराल तर तुम्ही उत्सवाच्या बजेटमध्ये सहजपणे बजेट सांभाळून खरेदी करू शकता. खरेदी करताना एकदा आपण आपली खरेदी सूची तपासा. जेणे करून अनावश्यक वस्तू खरेदी करणं टाळाल. यानंतर, आपण प्रत्येक सूटची तुलना करा. सणांच्या वेळी आपल्या नातेवाईकांना भेटवस्तू देणे ही एक चांगली संस्कृती आहे. आपण किती महाग भेट देता, हे महत्त्वाचे नाही, आपला हेतू महत्वाचा आहे. 

रिटेल ट्रिक्समध्ये नका फसू

किरकोळ विक्रेते ग्राहकांकडून अधिकाधिक खरेदी करण्यासाठी विविध युक्त्या अवलंबतात. लॉयल्टी कार्ड्स, कॅशबॅक संधी, सौदे आणि सवलत यांसारख्या विविध प्रोत्साहनांची ऑफर देतात. त्यामुळे तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करू शकता. खरेदी करताना अशा युक्त्यांपासून सावध रहा. त्यांना टाळण्याचा मार्ग म्हणजे ऑनलाइन शॉपिंग आणि त्यांच्या नोटिफिकेशन बंद करणे. आपल्याला नक्की कुठे आणि कशासाठी खरेदी करायची आहे ते नेहमी पहा.