Delhi Blast Suspect Dr Umar Mohammad: दिल्ली बॉम्बस्फोटातील आत्मघातकी हल्लेखोर असल्याचा संशय असलेल्या डॉ उमर मोहम्मद याचा पहिला फोटो समोर आला आहे. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले. कथित आत्मघातकी बॉम्बरचा पहिला फोटो समोर आला आहे.
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथील डॉ. उमर हा डॉ. अदील अहमद राथेर आणि डॉ. मुजम्मिल शकील यांचा सहकारी होता. सोमवारी अटक करण्यात आलेल्या "व्हाईट कॉलर" दहशतवादी मॉड्यूलमध्ये जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या पोलिस पथकांनी त्यांचा पर्दाफाश केला होता. डॉ. उमरला त्याच्या साथीदारांच्या अटकेची माहिती मिळताच फरिदाबादहून पळून गेला. त्याने घाबरून स्फोट घडवून आणला. त्याने आणखी दोन साथीदारांसह हल्ल्याची योजना आखली आणि कारमध्ये डेटोनेटर ठेवला, अशी सूत्रांची माहिती आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये एक i20 कार दिसत आहे. चालकाने काळा मास्क घातला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाची ओळख मोहम्मद उमर अशी आहे, जो फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित आहे. दिल्ली पोलिसांनी पार्किंगमध्ये गाडी येताना आणि जातानाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये संशयित एकटाच दिसत आहे. तीन तास तो कारमध्येच बसलेला होता.
बॉम्बस्फोटांच्या तपासात जम्मू आणि काश्मीरमधील तारिक आणि मोहम्मद उमर ही दोन नावं समोर आली आहेत. ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला ती सलमान नावाच्या व्यक्तीचा होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान त्याने ती कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड केलं. पोलिस तपासात ही कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले आहे.
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एका काश्मिरी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे, ज्याच्या घरातून अमोनियम नायट्रेट आणि शस्त्रास्त्रे अशी सुमारे 360 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय, फरिदाबादमधील दुसऱ्या ठिकाणाहून 2563 किलो संशयास्पद स्फोटकंदेखील जप्त करण्यात आली आहेत. मुझम्मिलने हे घर भाड्याने घेतले होते.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत डॉक्टरला अटक केली आहे. श्रीनगरमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याच्या प्रकरणात आरोपी मुझम्मिल शकीलचा शोध सुरु होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. यापूर्वी, आणखी एका व्यक्तीला, डॉक्टर आदिलला अटक करण्यात आली होती. याशिवाय, डॉक्टर मोहम्मद उमर फरार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात इंसेंडिअरी डिव्हाइसचा वापर करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजत आहे. हे डिव्हाइस खड्डा करत नाही, तर जिथे जिथे रसायन पडेल तिथे ते पेटवते आणि स्फोटामुळे आग लागते.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.