या पाच कारणांमुळे कमजोर झाला आहे चीन

...म्हणून भारताशी युद्धाची हिंमत करणार नाही ड्रॅगन

Updated: Jun 17, 2020, 09:18 PM IST
या पाच कारणांमुळे कमजोर झाला आहे चीन title=

नवी दिल्ली : सुपरपॉवर बनण्याचं स्वप्न पाहणारा चीन एक कमजोर देश आहे. चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. कोरोनाच्या संकटात चीन जगापासून वेगळा पडला आहे. आर्थिक समस्यांपासून ते युद्धाच्या परिस्थितीपर्यंत अशी चीनच्या कमजोरीची पाच कारणं आहेत, ज्यामुळे चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही.

चीनचे अनफिट सैन्य

चीनचं सैन्य ताकदवान दिसत असलं तरी आतून ते कमजोर आहे. सैन्याच्या तयारीचा व्हिडिओ चीन जरी दाखवत असला आणि ताकदीचा उदोउदो करत असला तरी वास्तव हे आहे की लढाईची वेळ आली तर चीनचं सैन्य भारतीय सैन्यासमोर तग धरू शकत नाही. ही गोष्ट अगदी चीनचे संरक्षण तज्ज्ञही मान्य करतात. भारत आणि चीनमध्ये एलएसी म्हणजे लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोलचा बहुतांशी भाग पहाडी अर्थात पर्वतरागांचा आहे आणि या क्षेत्रात युद्धासाठी भारताचं सैन्य चीनच्या तुलनेत अधिक अनुभवी आणि ताकदवान आहे.

तसं पाहिलं तर चीनच्या सैनिकांची संख्या जगातली सर्वात मोठं सैन्य मानलं जातं. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये सुमारे २० लाख सैनिक आहेत. पण त्यातले २० टक्के सैनिक युद्धासाठी अनफिट असल्याचे चीनच्या सैन्याबाबत एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

आर्थिकदृष्ट्या कमजोर भारत

चीनची अर्थव्यवस्था सध्या कमकुवत आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. कोरोना काळात जगभरात चीनवरचा विश्वास उडाला आहे. एक काळ असा होता जेव्हा चीन निर्मिती क्षेत्रात सगळ्यात महत्वाचा देश होता. पण आता विकसित आणि विकसनशील दोन्ही प्रकारचे देश चीनमधून प्लांट दुसरीकडे नेण्याची तयारी करत आहेत. त्याचवेळी भारताकडे जग एक नवी संधी म्हणून पाहत आहे आणि अनेक विदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्याची तयारी करत आहेत. चीन कुठेना कुठे भारताच्या मजबुत होत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे हैराण आहे. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्ध सुरु झाले आहे. कोरोनामुळे आलेल्या विश्वव्यापी आर्थिक मंदीच्या फेऱ्यातून बाहेर पडणे चीनसाठी सोपी गोष्ट नाही.

कोरोना

कोरोना व्हायरसमुळे चीन जगात सगळीकडून घेरला गेला आहे. प्रत्येक देश चीनकडे बोट दाखवत आहे. चीनच्या विरोधात चौकशीची मागणी दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाचा सर्वात घातक परिणाम अमेरिका आणि युरोपमध्ये झाला. तिथं हजारो लोकांचा मृत्यू झाला. अजूनही मृत्युचं थैमान सुरुच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी कोरोनाला चायनिज व्हायरस म्हटलं आहे. अमेरिकेपासून युरोपपर्यंत चीनला वेगळं पाडण्याची मागणी होत आहे. येत्या काळात चीनसमोरची आव्हानं आणखी वाढणार आहेत.

सुपरपॉवर अमेरिकेशी बिघडलेले संबंध

चीन आणि अमेरिकेचे संबंध तसे कधीच चांगले नव्हते. त्याचं कारण हेदेखिल आहे की चीन अमेरिकेला मागे टाकून सुपरपॉवर बनण्याचं स्वप्न पाहतो. दोन्ही देशांत ट्रेडवॉरचा दीर्घ इतिहास आहे. कोरोना काळात अमेरिका आणि चीन यांच्या संबंधांमध्ये अधिक कडवटपणा आला आहे.

युद्धाच्या आघाडीवरही चीनची कोंडी

हिंदी महासागरापासून ते दक्षिण चीन समुद्रापर्यंत चीन प्रत्येक ठिकाणी घेरला जात आहे. साऊथ चायना समुद्रात चीनचे आक्रमक प्रयत्न ओळखून अमेरिका आणि चीनमध्ये वाद चालू असतो. त्यामुळे युद्धाच्या रणनीतीतही चीन कोंडीत सापडला आहे.

चीनच्या या पाच कमजोर बाजू आहेत. त्यामुळे चीन भारताबरोबर युद्ध करण्याच्या वाटेला जाणार नाही.