Forbes Richest List 2025: अंबानी अव्वल पण टॉप 10 श्रीमंतांमध्ये 2 पुणेकर; नावं वाचून बसेल धक्का

Forbes Richest List 2025 India To 10 People: देशातील अव्वल 10 श्रीमंतांच्या यादीमध्ये दोन पुणेकर आहेत असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरंय! पाहा संपूर्ण यादी

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 10, 2025, 01:25 PM IST
Forbes Richest List 2025: अंबानी अव्वल पण टॉप 10 श्रीमंतांमध्ये 2 पुणेकर; नावं वाचून बसेल धक्का
अव्वल 100 श्रीमंतांची यादी झाली जाहीर

Forbes Richest List 2025 India To 10 People: फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2025 ची घोषणा झाली आहे. या यादीमध्ये दरवर्षी भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे यासंदर्भातील तपशील जारी केला जातो. यंदाच्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 10 लाख कोटी रुपयांहून अधिक असून ते श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

Add Zee News as a Preferred Source

श्रीमंतांची संपत्ती कमी झाली

फोर्ब्सने नुकतीच भारतामधील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली असून या यादीनुसार देशातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींची एकूण संपत्ती 88 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. परंतु या अव्वल 100 व्यक्तींच्या संपत्तीत मागील वर्षभरामध्ये एकूण 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी या सर्व उद्योगपतींची संपत्ती 1.1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 97 लाख कोटी रुपये इतकी होती. 

संपत्तीत घट होण्याचं कारण काय?

रुपया कमकुवत झाल्यामुळे आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे हे नुकसान भारतामधील अव्वल 100 व्यक्तींना मोठं आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे, असे दिसत आहे. या साऱ्यांच्या संपत्तीत १०० अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. या यादीत कोणते दहा भारतीय आहेत जाणून घेऊयात...

भारतामधील टॉप 10 श्रीमंत व्यक्ती कोण?

1) मुकेश अंबानी - 105 बिलियन डॉलर

2) गौतम अदानी - 92 बिलियन डॉलर

3) सावित्री जिंदाल - 40.2 बिलियन डॉलर

4) सुनील मित्तल - 34.2 बिलियन डॉलर

5) शिव नाडर - 33.2 बिलियन डॉलर

6) राधाकृष्णन दमानी - 28.2 बिलियन डॉलर

7) दिलीप सिंघवी - 26.2 बिलियन डॉलर

8) बजाज कुटुंब - 21.8 बिलियन डॉलर

9) सायरस पुनावाला - 21.4 बिलियन डॉलर

10) कुमार बिर्ला - 20.7 बिलियन डॉलर

दोन पुणेकर

विशेष म्हणजे या श्रीमंतांच्या यादीमधील दोन नावं पुण्याशी संबंधित आहेत. यापैकी पहिलं नाव म्हणजे बजाज कुटुंब आणि दुसरं सॉयरस पुनावाला. बजाज कुंटुंबाची कर्मभूमि पुणे आहे. तर सायरस पुनावाला यांची कर्मभूमिही पुणेच आहे. पुनावाला यांची औषध निर्मिती कंपनी सिरम इंस्टीट्यू पुण्यातच आहे. 

कोण किती श्रीमंत

> हल्दीराम स्नॅक्स फूडचे किशन अग्रवाल, मनोहर अग्रवाल आणि मधुसूदन अग्रवाल हे 9 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 80 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह 28 व्या स्थानावर आहेत.

> वारी एनर्जी चालवणारे दोशी भावंडे या वर्षीच्या यादीत 37 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 7.5 अब्ज डॉलर म्हणजेच 67 हजार कोटी रुपये इतकी आहे.

> इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीजचे संस्थ वाचानी 80 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 3.85 अब्ज डॉलर्स इतकी असून केपीआर मिल्सचे के.पी. रामास्वामी हे 29 हजार कोटींच्या संपत्तीसहीत 97 व्या क्रमांकावर आहेत. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More